...या नदीपात्रातून रेती राहुलच्या जेसीबीने, दोन भावासह एकांचा रात्रो चालतो खेळ खंडोबा ! महसूल प्रशासन सुस्त!
...या नदीपात्रातून रेती राहुलच्या जेसीबीने, दोन भावासह एकांचा रात्रो चालतो खेळ खंडोबा ! महसूल प्रशासन सुस्त!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
जिल्ह्यातील वर्धा नदीवर काही गावे वसली आहेत. या गावातील वढा, पांढरकवडा, धानोरा( पिपरी) मारडा या घाटावर रोज रात्री अवैद्यरित्या रेती माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. या नदीपात्रातून रेती राहुलच्या जेसीबीने उपसा करून या परिसरातील दोन भावासह रात्रो एकाचा खेळ खंडोबा सुरू असतो. पिपरी गावातील अर्धा किलोमीटरवर असलेल्या नदीपात्रातून रोज ट्रॅक्टर सह हाॅप्टने रेतीचा उपसा केला जातो. गावाच्या वेशीवर रेती साठा जमा करून तो अवैध्य मार्गाने वाहतूक होत असतो.
या नदी घाटावरील अनेक वेळा महसूल विभागाने थातूरमातूर कारवाई करून यांना जीवनदान दिले आहे.
महसूल विभागाच्या आशीर्वादाने फल फुललेले रेती माफिया चांगले बेडर झाले आहेत. एका ट्रॅक्टर पासून रेतीचा धंदा सुरू करणाऱ्या या रेती माफियाकडे चार-पाच ट्रॅक्टर असल्याची चर्चा सुरू आहे. गाव पातळीवर दबक्या आवाजात  चर्चा सुरू असून, 'आहा बैल मुझे मार'... , या मनीप्रमाणे कोणी लावून घेत नसल्याने या रेतीमाफीयांचे चांगलं चांग भलं होत आहे.  शासनाच्या महसूल  विभागाला कोट्यावधीचा फटका बसत असतो. महसूल विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला या संदर्भातली माहिती असताना सुद्धा  डोळ्यावर पट्टी बांधून आंधळेपणाची भूमिका प्रशासन बजावत आहे.
  पांढरकवडा वडा, पिपरी मारडा या गावातून रात्री सर्रास  वाळूची तस्करी होत असतात.  रात्रो  रेतीचे ट्रॅक्टर गावातून जात असल्यामुळे नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. थातूरमातूर कारवाई करून अनेक वेळा या रेतीमाफीयांना  महसूल विभागाचा आशीर्वादच मिळतो. जणू काही, आम्ही मारल्यासारखे करतो ,तुम्ही रडल्यासारखे करा! हा प्रकार रेतीमाफीयासी सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखोचा  महसूल  नदीच्या पात्रात वाहून जातो त्याचे काय? म्हणून या परिसरातील नदी घाटाची पाहणी करून संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकाकडून केली जात आहे.