कामगाराला ट्राँक्टरला बांधून मारहाण बेलगाव येथील घटना! व्हिडिओ व्हायरल!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (ब्रम्हपुरी)
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील
बेलगाव येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा काम सुरू आहे. हा मजुर बीड जिल्ह्यातील असुन भागवत जगताप नावाच्या कंत्राटदारांकडे काम करतो. पण दिनांक १/४/२०२३ ला सदर मजुराला माझ्या पत्नी कडे का बघितला म्हणून अमानुष मारहाण करण्यात आली. यांची माहिती ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व दोन्ही बाजूंच्या लोकांना ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात आणले. पंरतू दोघांकडून तक्रार दाखल करण्यास तयार नसल्याचे माहिती पोलीस निरिक्षक आंबोरे यांनी माध्यमाशी दिली.दोघांकडून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
तरी पोलिसां तर्फे सोशल मीडिया वायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल करून घेतला जाईल का? अशी चर्चा आता परिसरात होत आहे.
सदर मजुरांची तक्रार लिहिली गेली. पण त्याच्या वर कंत्राटदारांचा दबाव निर्माण झाल्यामुळे त्यांनी तक्रार वर सही केली नाही. अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली नाही. ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात सेंटलमॅन गुरू कार्यरत आहेत. हा मध्यस्थी प्रकरण मिटवण्याच्या प्रयत्न असल्याची चर्चाही होत आहे .
त्यामुळे अशा पिडीत व्यक्तीना न्याय मिळत नसतो.
अशा प्रकारचे अमानुष छळ करणाऱ्या कायद्याच्या
बंधनात राहून त्याला कारवाई करणे शक्तीचे असताना खुल्या सार्वजनिक टाँक्टरला बांधून त्याला मारहाण करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला काही त्रास असेल तर त्यांनी याची माहिती पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक होते. परंतु त्या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे काही प्रकरणातून असा प्रकार झाला का याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.