राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांचा कायम राहण्याचा निर्णय



राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांचा कायम राहण्याचा निर्णय

दिनचर्या न्युज :-

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर केली.

आपण निवृत्तीचा निर्णय मागे घेतल असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंलं आहे. मागील तीन दिवसांपासून देशभरातील कार्यकर्ते आणि पक्षांनी मला निर्णय मागे घेण्यासंदर्भात विनंती केली होती. कार्यकर्त्यांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याचं पवारांनी जाहीर केलं.

निवड समितीने बैठकीमध्ये दोन प्रस्ताव ठेवले होते. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समस्य समिती देणार आहे. पहिल्या प्रस्तावाला शरद पवार कायम नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार आहे. दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात आलं.

शरद पवारांनी केलं होतं सूचक वक्तव्य

कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांच्या नाराजीनंतर, त्यांच्या आंदोलनानंतर शरद पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याबाबत येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया खुद्द शरद पवार यांनी दिली होती.

दोन दिवसानंतर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे. पक्षातल्या लोकांच्या तीव्र भावना मला दिसत असून मी हा निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला असल्याचं पवार म्हणाले. नवं नेतृत्व तयार व्हावं यासाठी हा निर्णय घेतला आहे.

त्याचप्रमाणे मला एक खात्री होती की मी तुमच्याशी चर्चा केली असती तर तुम्ही सकारात्मकता दर्शविली असती, तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती. पण मी ते केलं नाही अशी प्रांजळ कबुली शरद पवारांनी आपल्या प्रेमापोटी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संवादादरम्यान दिली.