भीषण सडक अपघातात एकाच परिवारातील चारजनाचा मृत्यू.
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर घुग्गुस जाणाऱ्या चिंचाळा जवळील गावाजवळ जबरदस्त बेलोरो गाडीचा अपघात झाला. एकाच परिवारातील चार लोकांचा जागीच मृत्यू झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यात दुःखद घटना घडली आहे. या भीषण अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील मालेगाव येथील एकाच कुटुंबातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दिनांक 23/ 6 /2023 ला दुपारी घडली असून चिंचाळा या गावातील अहमद लॉन जवळील टर्निंग वर या अगोदरही बरेचसे अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून पोलीस घटनास्थळी येऊन अपघातात मृत्यू झालेला ना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मालेगाव रहिवासी रफिक नबी वस्ताद शेख, त्यांची पत्नी सजिदा शेख, युसुफ नबी वस्ताद शेख, आणि त्यांची पत्नी मुमताज शेख हे सर्वजण स्वतःच्या बोलोरा गाडीने पारिवारिक कार्यक्रमासाठी राजुरा येथे गेले होते. तेथून कार्यक्रम आटपुन वापस येताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चिंचाळा गावाजवळील डिव्हायडरला गाडी आढळून समोरील गाडीला जोरदार टक्कर मारली. यात गाडीतील सर्वांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
या अपघातात मृत्यू झालेले दोन्ही भाऊ हे स्वतः व्यावसायिक होते अशी माहिती समोर आली आहे. अपघातात बोलोरो गाडी पूरी तरह शक्तीग्रस्त झाली असून गाडीतील मृत्यू व्यक्तींना कंटेनर द्वारे बाहेर काढण्यात आले. अशी माहिती समोर आली आहे. पडोली पोलिसांनी सर्व शव पोस्टमार्टम साठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले आहे. पुढील कारवाई पडोली पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात सुरू आहे.