दुर्गापूर पाणी पुरवठा योजना नविन पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

दुर्गापूर पाणी पुरवठा योजना नविन पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
' हर घर जल' या संकल्पनेसह भारत सरकारने 2024 पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटूंबांना नळ कनेक्शन द्वारे पुरेसे पाणी सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जल जिवण मिशन (J.J.M) सुरु केले. परंतु चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर गावात नागरीकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी जल जिवन मिशन अंतर्गत कोट्यावधी निधी शासनातर्फे मंजुर करण्यात आले आणी कंत्राटदाराला कंत्राट देतांना शासनातर्फे घालुन दिलेल्या अटी व शर्तीना फाट्यावर मारण्याचे काम करण्यात आले आहे.
सध्या दुर्गापूर पाणी पुरवठा योजनेत पाण्याचे टाकीचे बांधकाम व त्या परिसरातील वालकंपाउड चे काम सुरु आहे आणी त्याठिकाणी दुर्गापूर पाणी पुरवठा योजनेचा फलक लावण्यात आला आहे फलकावर विलास पाटील कंत्राटदाराचा नाव लिहीलेला आहे परंतु विलास पाटील या कंत्राटदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक न लिहीता त्याठिकाणी काम करीत असलेल्या एका कर्मचाऱ्याचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंद केला आहे गावातील नागरीकांना, सामाजीक कार्यकर्त्यांना, पुढारी लोकांना कंत्राटदार हा खरी माहीती न देता शासनाची दिशा भुल करणारी माहीती पुरवित असल्याचे निष्पण होते. कंत्राटदाराच्या माध्यमातुन टाकीचे बांधकामाकरीता लागणारे सर्व साहित्याचे गावातील *मा. विनीत एस.तावाडे. बसपा युवानेता तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष दुर्गापूर, पावलस रत्ने, मा. तंटामुक्त समिती अध्यक्ष, सुरजभाऊ रामटेके सामाजीक कार्यकर्ते, किशोर मलिये सामाजीक कार्यकर्ते, उमेश भाऊ हाटे सामाजीक कार्यकर्ते, प्रणय ढोरके.* व इत्यादी नागरीकांनी नविन पाण्याची टाकीची बांधकामाची पाहणी केली तेव्हा टाकीचे फाउंडेशनच्या कामाचे सर्व व्हिडीओ आपल्या *कॅमेराने मोबाईल मधे कैद केले.* जसे की माती मिश्रीत रेती, सिमेंट हे अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले तसेच रेतीची रॉयल्टी नाही वालकंपाउंड बांधण्यासाठी संपुर्ण माती मिश्रीत रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, पाण्याच्या टाकीचे फाउंडेशनच्या कामाला पि.पी.सी (Fiyash based) P.P.C सिमेंट बॅग वापरण्यात आले, टाकीचे फाउंडेशन क्रांकीट ढलाई करतांना एक बॅग P.P.C सिमेंट आणी पंधरा घमेले रेती तर पंधरा घमेले गिट्टीचा वापर झाला असुन हे खुप निकृष्ट स्वरुपाचे माप असल्याचे निदर्शनास आले, टाकीचे फाउंडेशन जालीचा लोहा बांधणी ही शेड्युल बी (इस्टीमेट) नुसार नसल्याचे दिसुन आले व फाउडेशन ला EXTRA बार दिलेले नाहीत व रिंगचे डिस्टन्स जास्त ठेवल्याचे आढळले त्यावेडेस या नवीन पाण्याचा टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात येताच विनित तावाडे, पावलंस रत्ने यांनी लगेच जल जीवन प्राधिकरण चंद्रपूर कार्यालयाचे अभियंता उद्धरवार साहेब व ताम्हण साहेब यांचाशी मोबाईल द्वारे संवाद साधला पाण्याच्या टाकीचे फाउंडेशन व वालकंपाउंड चे सर्व कामे निकृष्ट असल्याचे निदर्शनास आणून दिले होते परंतु उद्धरवार व ताम्हण यांनी कंत्राटदाराची कान उघडनी केली नसावी किव्हा या अधिकाऱ्यांचे या कंत्राटदाराशी जवळीकतेचे संबंध असावे या करिता पाण्याच्या टाकीचे कामे फाउंडेशन चे काम पूर्ण होई पर्यंत जल जिवन प्राधीकरण चंद्रपूर कार्यालयाचे निरीक्षक किवा अभियंता रेतीची क्वालिटी, क्वानटीटी आणी कामामध्ये वापरण्यात येणाऱ्या साहीत्याची तपासणी (चाचणी) करण्याकरिता त्या ठिकाणी उपस्थित नव्हते हे ही निदर्शनास आले.

असा निकृष्ट दर्जाचे पाण्याचे टाकीचे काम सुरु असून याकडे प्रशासन व बांधकाम विभागाचे कोणते ही पारदर्शकता / नियंत्रण कमेटी असुन सुध्दा नसल्यासारखे आहे. कंत्राटदार हा शासनाच्या निधीची लुट करून शासनाची फसवणुक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. या दुर्गापूर पाणी पुरवठा योजनेला अनुसरून नविन पाण्याची टाकीचे काम उत्कृष्ट दर्जाची होईल म्हणून *दिनाक 19 जुन 2023 ला* मा. विनित एम. तावाडे,पावलंस रत्ने, सुरज रामटेके,प्रणय ढोरके, सोहेल कुरैशी, वसीम कुरैशी, उमेश हाटे, किशोर मलिये इत्यादी सामाजीक कार्यकर्ते जल प्राधीकरण कार्यालयास जावून अभियंता उद्धरवार साहेब यांची भेट घेतली व या सर्व बाबीवर चर्चा करून कान उघडणी केल्यानंतर लेखी स्वरुपात निवेदन देताना सात दिवसाचा कालावधी देण्यात आले जर का कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई व काळ्या यादीत समावेश न केल्यास आपल्या कार्यालयासमोर तिव्र गतीचे आमरण उपोषण करण्यात येईल असे ठणकाउन सांगण्यात आले.