21 लाखाचा देशी दारुचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला
21 लाखाचा देशी दारुचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने पकडलादोन चारचाकी वाहनासह १०० बॉक्स देशी दारू जप्त

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

दिनांक 5 जुलै, 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारावरुन गजानन मंदीर वार्ड जवळील गार्डन समोरील एका घरासमोरील दोन संशयीत इसम व त्याचे ताब्यातील वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यातील एका पांढऱ्या रंगाचे डस्टर गाडी क्रमांक एम.एच.14 डीएन 7569 मध्ये व एका पांढऱ्या रंगाचे पोलो कार क्रमांक एम एच 02 बीवाय 8154 या कारचे डिक्की व मागील सिटवर 100 खरडयाचे बॉक्स ज्यात 90 एम.एल. नी भरलेल्या देशी दारु रॉकेट संत्रा कंपनीचे मिळुन आल्याने सदर इसमांना ताब्यात घेवुन नमुद दोन्ही कार व त्यातील देशी दारु असा एकुण 21,10,000 /- रुपयाचा माल जप्त करण्यात आला येवुन पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनि विनोद भुरले, पोलीस अंमलदार संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, प्रांजल झिलपे यांनी केली आहे. सदरची बातमी आपल्या लोकप्रिय चॅनल तथा वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यास सादर आहे..