ऍड. हिराचंद बोरकुटे यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्तीऍड. हिराचंद बोरकुटे यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक सदस्य,पक्षाचे जेष्ठ नेते,पुरोगामी विचारवंत,तथा ओबीसी चळवळीतील आद्य कार्यकर्ते ऍड.हिराचंद बोरकुटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या "प्रदेश सरचिटणीसपदी" नियुक्ती, पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवारसाहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादीचे राज्याचे नेते आ.अनिलबाबू देशमुख यांच्या शिफारसीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष आ.श्री.जयंतराव पाटील यांनी केली.
*श्री.हिराचंद बोरकुटे यांना नियुक्ती पत्र देतांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी भावी राजकारणाच्या शुभेछ्या देत पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले ! हिराचंद बोरकुटे यांच्या नियुक्ती बद्दल महीला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, मुनाज शेख,दीपक जयस्वाल,युवक जिल्हाअध्यक्ष राकेश सोमाणी,अरुण निमजे,सुनील काळे,नगरसेविका मंगला आखरे,सुमित समर्थ,जयंत टेमुर्डे,रघुनाथ बोरकर,प्रफुल महाजन,डि.के.आरिकर, बादल उराडे,शरद जोगी,महादेवराव पिदुरकर,संजय वैद्य,राजेंद्र आखरे, वासु सौंदरकर,सुनील मैंद,शरद मानकर, डॉ.आनंद अडबाले, निपचंद शेरकी,चंद्रकांत अग्रवाल,सुहास बहादे, इत्यादींनी अभिनंदन केले.