माना जमातीच्या ५०० विद्यार्थ्यांचे जात वैधता पडताळणीमुळे भविष्य धोक्यात ! शासन प्रशासनाचे पक्षपाती धोरण- पत्रकार परिषदेतून आरोप



माना जमातीच्या ५०० विद्यार्थ्यांचे जात वैधता पडताळणीमुळे भविष्य धोक्यात ! शासन प्रशासनाचे पक्षपाती धोरण- पत्रकार परिषदेतून आरोप

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील माना जामातीच्या जवळपास ५०० विद्यार्थ्यांचे भविष्य जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीमुळे धोक्यात आले आहेत. शासन प्रशासनाच्या पक्षपाती धोरणामुळे माना जमातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप माना आदिम जमात समन्वय समिती व माना आदिल जमात जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्यावतीने पत्रकार परिषदेतून केला आहे.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही माना जमातीचे प्रकरण समितीकडे प्रलंबित आहेत. परंतु त्याच दरम्यान इतर आदिवासी जमातीचे प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आलीआहेत. मात्र माना जमाती सोबतच समिती भेदभाव, पक्षपात केल्या जात असल्याने माना जमीतीचे संघटनेचे म्हणणे आज जात पडताळणी आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्याकडे संघटनाच्या जवळपास 200 लोकांनी भेट घेऊन तात्काळ प्रकरणे निकालने लावण्याची मागणी केली.
मागील सहा महिन्याच्या वरील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र इतर जमातीचे तातडीने प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. इतर जमातीचे प्रकरण दक्षता पथकाकडे न पाठवता निकाली काढले जातात. परंतु माना जातीचे प्रत्येक प्रकरण दक्षता पथकाकडे पाठवले जाते. यावरून पडताळणी समिती माना जमती बाबत व्हेज पूर्ण व सडबुद्धीने कार्य करत असल्याचे व हेतू पुरस्कार समाजावर अन्याय करत असल्याचे माध्यमांसमोर सांगितले.
यापूर्वी असे न होता, संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रक्ताच्या नातेसंबंधातील लोकांनी प्राप्त केलेल्या वैधता प्रमाणपत्राचे संदर्भ देत प्रस्ताव सादर केलेत. तेव्हा पडताळणी समितीने उलट अशा प्रस्तावाची पुनच्छ चौकशी करण्याचे धोरण अवलंबले आहेत. जेव्हा माननीय न्यायालयाने असे करण्याची आवश्यकता नसल्याचे आदेश नमूद केले असताना सुद्धा चौकशीच्या नावाखाली हेतू पुरस्कार प्रकरणे प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोपही केला. मानाजमतीच्या प्रतिनिधीने वेळोवेळी पाठपुरावा व चर्चा करून फक्त आश्वासनेच पदरी दिले.
मात्र आता नुकताच दहावी-बारावीचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने. जिल्ह्यातील जवळपास 500 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहेत. पंधरा दिवसाच्या आत प्रकरण तात्काळ निकाली न काढल्यास माना समाजाच्या वतीने अरविंद सांदेकर, मधुकर ढोक,दडमल , दडमल, शांताराम चौखे,यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.