शिदूर ग्रामपंचायतची  आर्थिक  भोंगळ कारभाराची चौकशीची तक्रार ही निरर्थक, हेतू पुरस्कर- सचिव
दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर :- 
 सिदुर ग्रामपंचायतची आर्थिक भोंगाळ कारभाराची  चौकशी करा अशी  तक्रार करणाऱ्या नागरिकांची मागणी हे निरर्थक असून आरोप हेतू पुरस्कार , नहाक त्रास देण्यासाठी केलेली तक्रार आहे. तशी माहिती वृत्तपत्रात  बातमी  दिली. 
प्रत्यक्षात गावात जाऊन बघितले असता काम सुव्यवस्थित आहे .नियमानुसार काम झालेलेअसून नियमानुसार देयके अदा केलेले आहे. नागरिकांची कुठलीही तक्रार नाही. फक्त बाबा सुरतीकर यांनीच माझ्या संदर्भात तक्रार केली असून ती निरर्थक असून अशा प्रकारचा कुठलाही आर्थिक घोटाळा झाली नसल्याची माहिती शिदूर ग्रामपंचायतच्या सचिव यांनी माध्यमांना दिली.  ही संबंधित बातमी ही निरर्थक व हेतू पुरस्कार तक्रार केल्याचे  सांगण्यात आले आहे. गावात अशा प्रकारचे काही लोक असतात की ज्यामुळे गावात कामे केली असले तरी त्यांना ती पावल्या जात नाही अशा प्रकारचा आरोप सचिव यांनी केला.
 

 
 
 
 
