चिमूरच्या आमदाराची चंद्रपुरात बॅनर बाजी करणे म्हणजे वरिष्ठ नेत्यांना डीवचने होय का?




चिमूरच्या आमदाराची चंद्रपुरात बॅनर बाजी करणे म्हणजे वरिष्ठ नेत्यांना डीवचने होय का?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचा काल वाढदिवस झाला. त्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर शहरात मुख्य मार्गावर प्रत्येक पोलवर पोस्टर बॅनर( फलक) लावण्यात आले. यामुळे या आमदाराची चंद्रपुरात नवीन राजकीय खेेळी खेळली तर जात नाही ना? नाही तर मग, ही दिवाळखोरी आपला मतदार संघात सोडून चंद्रपुरात कशासाठी असा प्रश्न चंद्रपूर करांना चांगलाच भेडसावत आहे. चिमूरच्या आमदाराची एन्ट्री चंद्रपुरात होणे म्हणजे शहरातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना डिवचने होय काय? असा सुर चंद्रपूर शहरात सुरू झाला आहे. कारण या आमदारासोबत चंद्रपुरातील वरिष्ठ नेत्यासोबत कधीही जुळवा जुळवी झालेली नाही अशी चर्चाही आहे. मग एवढी बॅनरबाजी शहरात कशासाठी. एवढेच नाही तर काही मोजक्या माध्यमांना मोठमोठ्या जाहिराती करण्यात आल्या हे सत्य असले तरी, चंद्रपूर शहरात बॅनरबाजीचे उत्सुकता का?
सध्या महाराष्ट्र राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. सर्व विधानसभा क्षेत्रातील सदस्य अधिवेशनात व्यस्त असताना. महाराष्ट्रात सर्वीकडे अतिवृष्टी, पूरपीडित , शेतकरी, गोरगरिबाचे फार मोठे पावसाने नुकसान होत असताना. या आमदाराला मात्र बॅनरबाजीच्या माध्यमातून प्रसिद्धी करून घेतली आहे.