जिल्हाधिकारी कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही हेल्मेटची शक्ती !
जिल्हाधिकारी कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही हेल्मेटची शक्ती !


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा अधिकारी कार्यालयात जाणाऱ्या नागरिकासह व कर्तव्यास असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आत मध्ये जाणाऱ्या मुख्य गेटवर आरटीओ कार्यालयातील कर्मचारी हेल्मेट नसणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करीत आहेत. या संदर्भाचा आदेश जिल्हा अधिकाऱ्याकडून असल्याचे आरटीओ कार्यालयातून सांगण्यात येत आहे.
यापूर्वी काही दिवसा अगोदर जिल्हा परिषद कार्यालयात अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली होती .परंतु ती कालबाह्य राहिली. आता सर्रास गाड्या बगर हेल्मेटने आत घालता जाताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात या परिसरात असणारे तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, आणि याच परिसरातून आत मध्ये जाणारे प्रशासकीय भवनामधील कर्मचाऱ्यांना आता हेल्मेटची शक्ती बंधनकारक झाली आहे. या संदर्भात आरटीओ कार्यालयातील कर्मचारी टू व्हीलर वाहन चालकावर शक्तीची कारवाई सुरू आहे.