नवजात बालक विक्री प्रकरणात राजकीय पक्षाच्या दोन महिला अडकल्या , न्यायालयीन कोठडी... !

विविध राजकीय पक्षांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी 

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर रामनगर पोलिसांनी नवजात बालक विक्री प्रकरणात मोठ्या राजकीय पक्षाच्या दोन महिला कार्यकर्त्यांना रामनगर पोलिसांनी पाॅस्को आणि जे जे ऍक्ट अंतर्गत अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आले आहे.
चंद्रपूर रामनगर पोलिसांनी यापूर्वी नवजात बालक विक्री प्रकरणात बाळाची आई आणि तिचा प्रियकर अजय फुलझेले याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर चंद्रपुरातील सायली येरणे व भाग्यश्री हांडे हया भाजप  पक्षाच्या पदाधिकारी आहेत. यांना अटक करून न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणात केवळ संबंधित महिलाच नव्हे, तर यामागे मोठे रॅकेट किंवा प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग आहे का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. या प्रकरणाला
नवजातबालक विक्रीपुरता मर्यादित न ठेवता त्यामागे मानवी तस्करी (Human Trafficking), अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, संघटित सेक्स रॅकेट किंवा नवजात बालक विक्रीचे मोठे नेटवर्क कार्यरत आहे का, याचाही सखोल तपास करण्यात यावा. अशी मागणी आता जोर धरत आहे.
तपास केवळ अटक झालेल्या महिलांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण साखळी उघड केली पाहिजे. जर या प्रकरणामागे राजकीय संरक्षण असेल, तर तेही जनतेसमोर आले पाहिजे. अशी मागणी ही होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावरील स्वतंत्र यंत्रणेमार्फत करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच बालक विक्रीसारख्या अमानुष गुन्ह्यात कोणालाही राजकीय संरक्षण मिळू नये,
विविध राजकीय पक्षांकडून कठोर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. 

 कठोर कारवाई व्हावी अशी भूमिकाही आता राजकीय पक्षातूनच केली जात आहे.