सिदुर ग्रामपंचायतील ग्रामसेवक यांच्या आर्थिक भोंगाळ कारभाराची चौकशी करा- गावातील नागरिक




सिदुर ग्रामपंचायतील ग्रामसेवक यांच्या आर्थिक भोंगाळ कारभाराची चौकशी करा- गावातील नागरिक

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत शिदूर येथील ग्रामसेवक यांनी अनेक प्रकारच्या कामामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप गावातील नागरिक बाबा सुरतीकर यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर , तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.
ग्रामसेवक यांची ग्राम पंचायत मधील आर्थीक व्यवहाराची चौकशी व्हावी. आतापर्यंत ग्रापपंचायतच्या सर्व प्राप्त निधीचे व खास करुन सामान्य फंडा अंतर्गत झालेल्या कामाची अदा केलेले बिलाची चौकशी करावी.
सध्या स्थितीमध्ये रुजू असलेल्या ग्रामसेवक यांची रुजू दिनांकापासून ते आज पर्यंत केलेल्या ग्रामपंचायतच्या आर्थीक व्यवहाची चौकशी केली तर अनेक गबाळ समोर येथील.

ग्रामपंचायत सिदुर येथील मौजा इथे झालेल्या १५ वित्त आयोग अंतर्गत झालेले पूर्ण कामे निकृष्ट दर्जाचे आहे असे गावातील नागरिक यांचे असे म्हणणे आहे व झालेली mb पूर्ण पणे खोटी आहे, तसेच सामान्य फंड मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालं आहे, या बद्दल गावातील नागरिकाकडून सन 2021-22 -मध्ये शाळेच्या मैदाना करिता 88.840 निधी मंजूर झाला होता. त्या कामाचा निधी ग्रामपंचायत काम पुर्ण केले असून त्या कामाचे बिल काढून टाकले आहेत. फक्त मैदानावर मुरुम टाकुन लालीपोत करून 6/7 जेसीबी लावून गावक-यांच्या डोळ्यात धूळ झोकत आहे.

ग्राम पंचायत सिदूर पंचायत समिती चंद्रपूर येथे सध्यास्थितीत रुजू असलेले ग्रामसेवक यांना ग्राम पंचायतच्या कुठल्याही निधी बाबत माहीती. विचारली असता वेळेवर बरोबर माहीती देत नसून माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात.
जसे की खर्चिक. (उदा. १५ वित्त आयोग अंतर्गत शाळेच्या कामाबाबत माहीती ३ महिण्यानंतर दिली) असे आम्हा गावकऱ्यांच्या निदर्शनास येते की, पहिले बिल काढणे व नंतर कोणतेही काम दाखवून त्याची सावरासावर करण्यात येत.तरी ग्रामपंचायत शिदूर येथील ग्रामसेवकाच्या चौकशीची मागणी गावातील नागरिक बाबा सुरतीकर यांनी केली आहे.