.. या मागण्यांसाठी पालकमंत्र्यांच्या घरावर गैर आदिवासी ,आदिवासींचा मोर्चा

.. या मागण्यांसाठी पालकमंत्र्यांच्या घरावर गैर आदिवासी ,आदिवासींचा मोर्चा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाची अव्हेलना करणाऱ्या वन अधिकारावंर कार्यवाही करण्यात यावी यामागणी साठी आदिवासी शेतकऱ्यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरावर उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात आदिवासीच्या वन जमिनी हक्कासाठी विविध मागण्याघेवून
तिन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी
वनहक्क कायद्यानुसार आदिवासी,गैर-आदिवासींना लवकरात लवकर पट्टे देण्यात यावे.
वहिवाट झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात मुनाऱ्या व टि.सी.एम. खोदु नये.
जंगल लगत आदिवासी-दलित लोकांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवून, न्याय देण्यात यावे.
वनहक्क कायदा भंग करुण, आदिवासी शेतकऱ्यांची शेती नासधुस करणाऱ्या वनअधिकाऱ्यावर ऍट्रासिटी एक्ट व वन कायद्यानुसार कारवाही करण्यात
जंगल लगतच्या सर्व शेतकऱ्यांना हिंसक प्राण्यापासुन शेतीला व स्वतःला वाचविण्यासाठी सोलर कुंपन देण्यात यावी. अशा विविध मागण्या घेऊन पालकमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य करावा अन्यथा आपली खुर्ची खाली करावी. वन अधिकाऱ्याच्या विरोधात मोर्चे करा कडून निषेध नोंदवण्यात आला.
नारे बाजी देत शिवाजी चौकातून धडक मोर्चा काढण्यात आला. काही अंतरावरच पोलीस प्रशासनाने मोर्चेकरांना अडवून ,त्यांची समजूत करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले.

वडिलोपार्जित वन जमिनीवर आदिवासी चे उपजीविकेचे साधन होते मात्र वन अधिकाऱ्यांनी त्या जमिनी हस्तगत केल्या मुळे आदिवासींना आज उपास मारीची वेळ आल्याने वन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या साठी पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा,काढण्यात आला, या मोर्च्यात शेकडो आदिवासी, गैर आदिवासी शेतकरी , महिलां उपस्थित होते, पोलिसांनी या मोर्चाला वन मंत्री यांच्या घरा समोरच न देता मधातच रोखले . पोलीस प्रशासनाला मान देत मोर्चेकर्‍यांनी सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.