महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ रामभरोसे :- राजेश बेले संस्थापक अध्यक्ष सं. पर्या. सा. संस्था
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यामध्ये घातक प्रदूषण प्रदूषणामुळे अनेक आजार मानवी जीव, पाळीव प्राणी, वन्यप्राणी, पक्षीयांना, वायु प्रदूषण जल प्रदूषणामुळेखूप मोठा घातक आजार व मृत्यू होण्याचे शक्यता नाकारता येत नाही
चंद्रपूर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यालयात मनुष्यबळ (अधिकारी वर्ग) नसल्यामुळे जिल्हयातील वाढते प्रदुषण लक्षात घेता तत्काळ मनुष्यबळ (अधिकारी वर्ग) देण्यात यावा अन्यथा दिनांक 18 जुलै 2023 रोजी घंटा नाद आंदोलन करुन तिव्र निषेध जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र प्रदुषण मंडळ चंद्रपूर कार्यालय परिसरात करण्याबाबत
संजीवनी पर्याय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेलेयांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार,अध्यक्ष, सदस्य सचिव, प्रादेशिक अधिकारी, उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा अधिकारी यांनाआंदोलनाची तक्रार दिली.
चंद्रपूर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यालया अंतर्गत येणारे जिल्हे चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गडचिरोली जिल्हा येत असते वेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यलयात फक्त एक उपप्रादेशिक अधिकारी यांच्या रामभरोश्यावर तीन जिल्हयाच्या कामाची जिम्मेदारी असल्यामुळे प्रदुषण ग्रस्त जिल्हयातील प्रदुषण कमी करण्याकरीता उपाय योजनेसाठी मुनष्यबळ आवश्यक आहे.
प्रदुषणाच्या टक्केवारी मध्ये चंद्रपूर जिल्हा भरता मध्ये चौथ्या क्रमांकावरती, महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावरती तसेच यवतमाळ जिल्हयामध्ये पण खुप मोठया प्रमाणात प्रदुषण वाढत आहे. गडचिरोली जिल्हयामध्ये पण लोह खनिज, आर्यन प्लॉन्ट, चुनखडी खानी, सिमेंट प्लॉन्ट प्रदुषण करणारे सारखे उद्योग सुरु झालेले आहे. तरी सुध्दा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यालयात मनष्यबळ नसल्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा पालकमंत्री यांच्या तिव्र निषेर्धात घंटा नाद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती
राजेश वा बेले यांनी दिली.