चांदा पब्लिक स्कूलचा मनमानी कारभार, फी न भरल्याने अनाथ विद्यार्थिनीला शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार




चांदा पब्लिक स्कूलचा मनमानी कारभार,
फी न भरल्याने अनाथ विद्यार्थिनीला शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार

आम आदमी पार्टीकडून शाळेत तीव्र आंदोलन

दिनचर्या न्युज :-
*चंद्रपूर, 22 ऑगस्ट:* येथील चांदा पब्लिक स्कूलमध्ये गत शैक्षणिक सत्रात दहावीत 84% गुणांसह उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी तनिष्का अनंत बलवीर हिला फी न भरल्याने शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे तिच्या पुढील शिक्षणासाठी अडचण निर्माण झाली आहे. या विरोधात आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात शाळेच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून आंदोलन सुरू आहे.

पीडित तनिष्का अनंत बलवीर ही चंद्रपूर येथील चांदा पब्लिकमध्ये केजी 1 पासून शिकत आहे. ती अनाथ असून, शाळेने यापूर्वी फी साठी कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. आणि 70 हजार रुपये शुक्ल भरण्याचा हट्ट शाळा प्रशासनाने केला.
अपवादात्मक विद्यार्थिनी असूनही तनिष्काच्या शैक्षणिक प्रवासात ७० हजार रुपये शुल्क भरण्याचा शाळेचा आग्रह आहे. धक्कादायक म्हणजे, शाळेने शुल्काबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. अशा स्थितीत तनिष्का आणि तिच्या पालनकर्ता काकांना हा आर्थिक भार ऐनवेळी सोसावा लागणार आहे. ती अनाथ असल्याने फी घेणार नाही, असे चांदा पब्लिक शाळा व्यवस्थापनाने सांगितले होते. मात्र, आता दुसऱ्या शाळेत पुढील प्रवेशासाठी तिला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जात आहे.
या विरोधात आम आदमी पार्टीच्या माध्यमातून शाळेत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात आम्ही पार्टीचे ज्येष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.
आमचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र न दिल्याने गरीब मुलीवर अन्याय होत आहे. तनिष्काचे इतरत्र शिक्षण सुरू ठेवण्याची शक्यता धोक्यात आली आहे. आम आदमी पक्षाने कठोर भूमिका घेत तनिष्काला न्याय देण्याची मागणी करीत रात्रीपर्यंत आंदोलन सुरू ठेवले होते. यावेळी शहर अध्यक्ष योगेश गोखरे, शहर सचिव राजु कुडे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, सुनिल सदभया, सुधीर पाटील, साखरकर काका, ऍड तब्बसुम शेख, भिमराव मेंढे उपस्थित होते.