आंबोरा गावातील नेताजी ताजनेचे घर आगीत जळून भस्म
आंबोरा गावातील नेताजी ताजनेचे घर आगीत जळून भस्म !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जानगर गावाला लागून असलेले आंबोरा हे गाव या गावातील नेताजी ताजने त्यांच्या घराला  काल भर दुपारी अचानक आग लागल्याने घरातील गृह उपयोगी साहित्य जळून आगित खाक झाले. घरातील कुटुंब कामानिमित्त बाहेर गेले असता अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जडून भस्म झाल्याने ताजने परिवारावर फार मोठे संकट कोसळले आहे.
संपूर्ण घरातील साहित्य जळाल्याने फार मोठे आर्थिक नुकसान झाले. सिएसटिपीएस येथील अग्निशमन दल आग विझवण्यासाठी आले नाही.
आग विझवण्यासाठी गावातील नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असता. तलाठी यांनी गावात येऊन संबंधित जडीत घराचा पंचनामा करून पुढील कारवाईस पाठवले असल्याची माहिती आहे. मात्र ऐन पावसाळ्यात घर जळाल्याने कुठे राहाव असा प्रश्न ताजने कुटुंबावर आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शार्क सर्किट मुळे लागले असल्याचा अंदाज आहे. पुढील तपास सुरू असून संबंधित कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.