भविष्यात मुख्यमंत्री व्हावे? मला ॲटम बॉम्ब लावता का? भर सभेत एकमेकावर पक्षांतर्गत आग पाखड!भविष्यात मुख्यमंत्री व्हावे? मला ॲटम बॉम्ब लावता का? भर सभेत एकमेकावर पक्षांतर्गत आग पांखड!


दिनचर्या न्युज

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने शनिवारी स्थानिक गांधी चौकात विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजन सोडण्यात विरोधी पक्षनेते यांच्या साठी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर ते दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिकेचे उद्घाटनासाठी भिवापूर वार्डातील साई मंदिर येथे कार्यक्रम करून गांधी चौकात आले. लोकनेते आणि महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व विजय वडेट्टीवार यांच्या विधानसभेच्या विरोध पक्ष पदी नेते निवड झाल्याबद्दल चंद्रपुरात नागरी सत्कार आयोजित समारंभात प्रथमच आजी-माजी आमदार काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले होते.
वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात मागील अनेक दिवसांपासून राजकीय वाद सुरू आहे. एकमेकांची नावे निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यापासून तर एकमेकांवर टीका करण्यापर्यंत हे भांडण सुरू आहे. मात्र शनिवारी सत्कार कार्यक्रमात एका मंचावर येताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसच्या २८ आमदारांनी वडेट्टीवारांच्या नावाला कसा विरोध केला, आमदार संग्राम थोपटे यांना समर्थन करीत वडेट्टीवार यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली, दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांना २८ आमदारांच्या स्वाक्षरीने पत्र दिले हा संपूर्ण किस्साच सांगितला. वडेट्टीवार यांना राज्यातून २८ आमदारांचा विरोध असताना त्यांनी दिल्लीच्या नेत्यांना
कोणती गोळी देवून विरोधी पक्षनेते पद खेचून आणले हे त्यांचे त्यांनाच माहिती. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले यासाठी त्यांचे अभिनंदन. भविष्यात त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, मी त्यासाठी त्यांचासोबत राहील असेही श्रीमती धानोरकर म्हणाल्या. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्यूनंतर वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर प्रथमच काँग्रेस पक्षाच्या मंचावर एकत्र आले होते. त्यावेळी वडेट्टीवारांनी
मला ॲटम बॉम्ब लावता का? भर सभेत एकमेकावर पक्षांतर्गत आग पाखड झाली! विरोधाभास झाल्याचे सभेद जाणवले.