चंद्रपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्याच्या डोक्यात हातोडा, गंभीर जखमी!

चंद्रपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्याच्या डोक्यात हातोडा, गंभीर जखमी!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालय असलेल्या भवनात शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या रूम नंबर सहा मध्ये बाबू घनश्याम मेश्राम याच्यावर याच कार्यालयात अगोदर कार्यरत असलेल्या चपराशी सुधाकर वाढई यांनी सोबत आणलेल्या हातोडीने त्याच्या डोक्यावर मारून जखमी केले. कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला.

परिसरात चर्चेनुसार सुधाकर वाढई हा यापूर्वी याच कार्यालयात चपरासी होता. कर्तव्यावर असताना त्याचे एक दोन वर्षापासून जीपीएसचे प्रकरण अनेक दिवसापासून प्रलंबित असल्याने तो वारंवार बाबू घनश्याम मेश्राम यांच्याकडे खेटा मारायचा . आजही तो सकाळी बाराच्या सुमारास येऊन मेश्राम बाबू यांना भेटून गेला . आणि परत सायंकाळी अंदाजे पाचच्या सुमारास पॉलिथिन मध्ये हातोडी घेऊन सरळ मेश्रामबाबू बसले असता त्या केबिनमध्ये जाऊन त्याच्या डोक्यावर हातोडीने वार केल्याने तो रक्त बंबाड झाला. कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले गेले. आणि पुढील अनर्थ टळला.
संबंधित प्रकरणाची  घनश्याम मेश्राम यांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली असता त्याच्या तक्रारीनुसार चपराशी सुधाकर वाढई यांच्यावर  कलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस येत आहेत.