डब्लू.सी.एलचा ओवर बर्डन चोरी करणाऱ्या सीएसटीपी एसच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा -राजेश बेले





डब्लू.सी.एलचा ओवर बर्डन चोरी करणाऱ्या सीएसटीपी एसच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा -राजेश बेले

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र कॉलनी परिसरात होत असलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निर्देशनात येत असल्यामुळे आदित्य कन्स्ट्रक्शन कंपनीला काळया यादीत टाकुन संपूर्ण झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र कॉलनी परिसरात कंपाऊंड भिंतीच्या कामामध्ये झालेल्या
भ्रष्टाचारामध्ये सहभागी असलेल्या अधिका-यांवरती निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.
चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र कॉलनी परिसरात कंपाऊंड भितीच्या कामामध्ये नित्कृष्ट दर्जाची सामुग्री वापरण्यात येत असल्यामुळे निरी नागपुर व VNIT शासकीय अभियांत्रिकी विद्यालय यांच्या मार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
वेस्टर्न कोलफिल्डस लिमीटेडच्या अधिकाऱ्याने दिले कारवाईचे आश्वासन
चंद्रपुर वेस्टर्न कोलफिल्डस लिमीटेड खेरगाव लागुन असलेल्या ओव्हर बर्डन चोरी करुन चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपुर संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी वापरत असल्यामुळे याची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा .तसेच वापरण्यात आलेली सामुग्री जप्त करण्यात यावी. अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.

चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र कॉलनी परिसरात वाघांची व प्राण्यांची हालचाल टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक कामे येथील वसाहतीमध्ये काटेरी तार व कॉन्सर्टिना कुंपन आणि संलग्न कामे देऊन विद्यमान परिघ कंपाऊंड, भिंतीचे अपग्रेडेशन आदित्य कन्स्ट्रक्शन कंपनी P.O.No. : HO/4370002865 PO Date 31/03/2022 रोजी 5 करोड़ 15 लाख 86 हजार 986 रुपयाचे कामांमध्ये नित्कृष्ठ दर्जाची सामुग्री वापरत असल्यामुळे कान्ट्रक्टर (ठेकेदार) यांना काळया यादीत टाकण्यात यावे व संबंधित अधिका-याला निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात यावे. या कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करुन संपूर्ण कामाची तांत्रिकरित्या निरी या संस्थे, VNIT द्वारे चौकशी करण्यात यावे.
चंद्रपुर महाऔष्णीक विद्युत केंद्राच्या वाल
चंद्रपुर कॉलनी परिसरात वाघ व प्राणी हालचाल टाळण्यासाठी काटेरी तार, कंपाऊंड, भिंतीच्या कामामध्ये नित्कृष्ठ दर्जाची सामुग्री वापरुन खूप मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्यामुळे ठेकेदार व संबंधीत अधिका-यांवरती कार्यवाही करण्यात यावी.
कंपाऊंड भिंतीचे कॉक्रीट पिल्लर (भिम) नियमाप्रमाणे खोदकाम करून काँक्रीट पिल्लर (भिम) घेणे बंधनकारक असुन सुध्दा खोलाई 2 फुट व रुंदी 4x4 इतकी घेण्यात आली आहे. हे आम्ही पाहणी करण्याच्या दरम्यान आढळुन आले आहे
कंपाऊंड भितीचे काँक्रीट पिल्लर (भिम) कांक्रीट मसाला या संपूर्ण नित्कृष्ठ दर्जाचे आहे. त्या
काँक्रीट RCC मसाला बनविते वेळी वापरण्यात आलेल्या रेती, गिट्टी, सिमेंट मानकाप्रमाणे वापरण्यात नाही आले हे निर्देशनास येत आहे. कंपाऊंड भिंतीचे गोटयाचे जुडाई करतेवेळी वापरण्यात आलेल्या रेतीला धुऊन वापरण्यात नाही डब्लू सी एल चा ओव्हर बर्डनची माती वापरण्यात येत आहे.
मानकाप्रमाणे सिमेंटचा वापर खुप मोठया प्रमाणात कमी करण्यात आल्याचे निर्देशनास येत,आहे. रेती आणि ती मिश्रित करून सिमेंट मध्ये वापर करण्यात येत आहे.
कंपाऊंड भिंतीचे बांधकामाचे वेळी निघालेला जुना भिंतीचा गोटा कुठे गेला तो त्या ठिकाणी दिसुन येत नाही.
काटेरी तार संरक्षण भिंतीवरती वापरण्यात येत असलेला तारांचा गेज कमी दिसुन येत आहे.
चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र कॉलनी परिसरात होत असलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निर्देशनात येत असल्यामुळे आदित्य कन्स्ट्रक्शन कंपनीला काळया यादीत टाकुन संपूर्ण कामाची चौकशी झाल्यास फार मोठे गबाळ बाहेर येण्याची शक्यता असल्याने चौकशी करून संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केले.