थर्मल पावर स्टेशन मधून पुन्हा जल प्रदूषण, औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - राजेश बेले




थर्मल पावर स्टेशन मधून पुन्हा जल प्रदूषण,
औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - राजेश बेले

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील आठवड्यात थर्मल पावर स्टेशनच्या दूषित पाण्यामुळे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा जल प्रदूषणामुळे खंडित करण्यात आला होता. चंद्रपूर शहरातील नागरिकांना चार दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागले होते. ती साई ओलीच असताना पुन्हा आज दिनांक 17/ 8/2023 ला चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातून दूषित पाणी रानवेंडली नाल्यावरून इरई नदी सी. एस. टी. पी. एस. परिसरातील वाहणाऱ्या नदीत पात्रात दूषित पाणी सोडण्यात आले.
. हे पाणी काही लाल कलर मिश्रित द्रव्य आणि कोळसा मिश्रीत प्रदूषित दोन्ही पाणी एकत्रित रानवेंडली नाल्यातून सोडले जात असल्याची पाहणी महाराष्ट्र प्रदूषण विभागाचे अधिकारी तानाजी यादव यांच्यासह संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली. यावेळी पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेतली असून. हे गढूळ पाणी असल्याचे
आणि त्या पाण्याचे एन एस जी नॉर्मल असले तरी पी एस सी केल्यास नंतर काय प्रदूषण आहे. कोणते द्रव सोडल्या गेले आहेत याची तपासणी झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रदूषण अधिकारी तानाजी जाधव यांनी दिली.
मात्र वारंवार जीवनवाहिनी असलेल्या नदीत प्रदूषण युक्त पाणी सोडल्याने येथील वन्यप्राणी, जल प्राणी, पशुपक्षी, आणि मानवी जीवनावर याचा विपरीत परिमाण होत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भाची माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सुद्धा असताना कुठलीही कारवाई होत नसल्याची खंत राजेश बिले यांनी व्यक्त केले आहे. फक्त संबंधित विभागावर दोन लाखाची गॅरंटी जप्त करण्यात आली. ती थातूरमातून कारवाई करून  प्रकरण दाबण्याचे प्रयत्न प्रदूषण विभाग करीत असल्याचा आरोप राजेश बेले यांनी केला आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास संजीवनी पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून मोठे जन आंदोलन  करण्याचा इशारा राजेश बेले यांनी दिला आहे.