निलिमा चव्हाणचा मृत्यू प्रकरण विधानसभेत गाजले, नाभिक समाजाची आक्रमक भूमिका

निलिमा चव्हाणचा मृत्यू प्रकरण विधानसभेत गाजले, नाभिक समाजाची आक्रमक भूमिका

दिनचर्या न्युज :-
दापोली : चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी व दापोलीच्या स्टेट २४ वर्षीय तरुणी निलिमा चव्हाण हिचा मृतदेह तालुक्यातील दाभोळ खाडीकिनारी आढळून आला असून त्यामुळे तालुक्यासह चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, निलिमा हिचा मृत्यू हा आकस्मिक नसून घातपाताचा संशय कुटुंबियाबरोबरच ओमळी गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दापोली स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी निलिमा सुधाकर चव्हाण, (वय २४ रा. ओमळी, ता. चिपळूण) ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेत सहा महिन्यापूर्वी कंत्राटी लिपिक पदावर रुजू झाली होती. गेल्या सहा महिन्यापासून करण्यात आली. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असल्याने ती आपल्या ओमळी गावी जात असे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष, ओबीसी,बारा बलुतेदार महासंघाचे नेते माननीय कल्याणजी दळे यांनी नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुहागर विधानसभा क्षेत्राचे आमदार भास्कर जाधव यांना माहिती दिली . आमदारानी तीन ऑगस्टला विधानसभाच्या सभागृहात प्रश्न उचलून धरला.
नाभिक समाजातील त्या कन्येला न्याय मिळावा यासाठी विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांनी या घटनेच्या संदर्भाची माहिती दिली. त्या मुलीचे पूर्ण केस काढून चेहरा विद्रुप केल्या गेले. छिन्ह विच्छिन्न अवस्थेत त्या मुलीचा मृतदेह तालुक्यातील दाभोळ खाडीकिनारी आढळून आला.
संबंधित घटनेबाबत उचित कारवाई करण्याचे आदेश अध्यक्षांनी राज्याचे मुख्यमंत्री, तथा गृहमंत्री यांनी तात्काळ द्यावे अशी मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी अध्यक्षांना त्या संदर्भाचे कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या घटनेचा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नाभिक समाजाकडून तीव्र निषेध नोंदविण्यात येत असून. नीलिमाला न्याय न मिळाल्यास राज्यात तीव्र आंदोलन नाभिक समाजाच्या वतीने करण्यात येईल. तत्पूर्वी नाभिक समाजाच्या भावनाचा उद्रेक होण्या पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तुरंत त्या निष्पाप मुलीला न्याय द्यावा अशी मागणी केली.

दि. २९ जुलैचा शनिवार हा महिन्याचा पाचवा शनिवार होता. मात्र, मोहरमची सुट्टी असल्याने शुक्रवारी रात्रीच निलिमाने आपला भाऊ अक्षय याला फोन करून आपण गावी येणार असल्याचे कळविले. निलिमा सकाळी दापोली
राहात असलेल्या रुमवरून गावाकडे जाण्यास निघाली. दरवेळेच्या वेळेत निलिमा घरी न पोहोचल्याने ओमळी येथे असलेल्या घरच्यांना घोर लागला व त्यांनी फोनाफोनी केली. निलिमाच्या मैत्रिणीने ती सकाळीच दापोलीतून निघून गेल्याचे सांगितले. पण या वेळी निलिमाचा फोन लागत नसल्याने तिच्या कुटुंबियांची काळजी वाढली. अखेर हताश होऊन चिपळूण व दापोली पोलीस स्थानकात निलिमा ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल
दापोली पोलीस ठाण्यात शनिवारी निलिमा ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दापोली पोलिसांनी आपला तपास सुरू केला. मात्र दुसऱ्याच दिवशी रविवार असल्याने बँक बंद असल्याने तेथून माहिती, तसेच सीडीआर मिळणे कठीण बनले. दापोली एसटी स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती तरुणी खेडकडे जाणाऱ्या बसमध्ये चढल्याचे दिसते.