नाभिक समाजा तर्फे सौ. सरोजताई चांदेकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार
नाभिक समाजा तर्फे सौ. सरोजताई चांदेकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नाभिक समाजातर्फे आज सौ.सरोजताई प्रकाश चांदेकर यांचा श्री संत नगाजी महाराज मंदिरात सत्कार सोहळा घेण्यात आला. प्रेम ज्योती नाभिक महिला मंडळ तर्फे पती-पत्नीचा साडी चोळी, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नाभिक समाजातील उत्कृष्ट अस व्यक्तिमत्व, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या पंचवीस वर्षाच्या प्रवासातून आज दिनांक 31/ 8/ 23 रोजी 58 व्या वर्षी जिल्हा परिषद चुनाभट्टी शाळेतून निवृत्त झाल्या. त्यांनी सर्वात प्रथम 1998 ला जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवात केली. 25 वर्षानंतर निवृत्ती घेताना त्या शाळेत भावनिक झाल्या असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. जिल्हा परिषद कडून आदर्श पुरस्कार शिक्षक म्हणून गौरवण्यात आले . सरोजताई यांनी नाभिक समाजासाठी मागील वीस वर्षापासून आपले योगदान देत आहेत. त्यांनी महिलांसाठी समाजाची ओढ असावी समाजाचे छोटे मोठे बचत गटाच्या माध्यमातून काम व्हावे. यासाठी पुढाकार घेऊन प्रेम ज्योती नाभिक महिला मंडळ या संस्थेची स्थापना केली. आज त्यांचे काम प्रेरणादायी आहेत. आता सरोजताई शैक्षणिक क्षेत्रातून निवृत्त झाल्या असल्या तरी ह. भ. प. कीर्तनकार म्हणून प्रख्यात आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार श्रीमती शालूताई चल्लीलवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर प्रकाशभाऊ चांदेकर, त्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक श्यामभाऊ राजूरकर यांनी केले, या कार्यक्रमाला नाभिक समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तू भाऊ कडूकर, सुशांत नक्षीने, अनिकेत चांदेकर, बाबाराव कडूकर, संदेश चल्लीलवार, भास्कर वाटकर, विजय मांडवकर, नितीन दुधलकर, अशोक कडूकर, वंदना पंदीलवार, भानूताई बडवाईक, वनिता नक्षीने, संध्याताई कडूकर,अलकाताई बडवाईक, गोविंदवार ताई, रंजना राजूरकर, गंगा राजूरकर, वंदना दुधलकर, यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवणकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन हर्षिता राजूरकर यांनी पार पाडले. या कार्यक्रमाची सांगता अल्पोहारांनी करण्यात आली.