20 दिवसानंतर रवींद्र टोंगे यांचे उपोषण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोडले devendra fadanvish mh
20 दिवसानंतर रवींद्र टोंगे यांचे उपोषण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोडले

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मुंबई येथे ओबीसी समाजाच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबई येथे बैठक बोलावली होती. ओबीसी समाजाची सकारात्मक चर्चा झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी दहा वाजता चंद्रपुरात उपोषण स्थळी दाखल झाले. उपोषण करते रवींद्र टोंगे, विजय बल्की, प्रेमानंद जोगी यांचे नींबू पाणी देऊन उपोषण सोडले.
महासंघ राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने 11 सप्टेंबर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.20 दिवसानंतर सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.


उपोषणात वीस दिवस न दिसणारे मुखवटे उपोषण स्थळी ?  चर्चा चर्चा...!

  मागील वीस दिवसापासून चंद्रपूर  जिल्हाधिकारी  कार्यालय समोर  उपोषण सुरू होते. ओबीसी समाजाच्या चारशे वर जाती आहेत.  प्रत्येक समाजाचे, राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी म्हणून नियुक्त आहेत. पण, काहींनी तर फिरकूनही बघितले नाही?
या संदर्भात विविध आंदोलन करण्यात आली. एक महामोर्चा सोडला तर, इतर कुठल्याही आंदोलनात अनेक नेत्यांचे मुखवटे दिसले नाहीत. मात्र आज  राज्याचे  उपमुख्यमंत्री   उपोषणाची सांगता करण्यासाठी आले असता. अनेक ओबीसी समाजाच्या  मुखवट्याचे दर्शन झाले!    अनेक नेत्यांनी आपले या ठिकाणी  फोटो  सेशन करून घेतले.!आणि शहरात एकच चर्चा सुरू झाली!, फक्त आणि फक्त राजकारण!  मात्र यात खरी उपोषण  कर्त्याला साथ देणाऱ्या त्या ओबीसी समाज बांधवाला सलाम!


ओबीसी समाजावर कुठल्याही अन्याय होऊ नये, मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, राज्यात बहात्तर वस्तीगृह त्वरित सुरू करावी. स्व आधार योजना लागू करावी अशा प्रकारचे सरकारने 26 जीआर काढल्याचे सांगितले. राज्य सरकार ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही, याची ग्वाही दिली. मराठा समाज, ओबीसी समाज एकमेकांसमोर उभा राहू नये. अशी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली . समाजात भेदभाव होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे. राज्यातील वस्तीगृह सुरू करून भाड्याने घेऊ एवढेच नाही तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थ्यांना पैसे उपलब्ध करून देऊ. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी मेडिकल कॉलेजला ओबीसी प्रवर्गातून 27% आरक्षण दिल्याचे त्यांनी बोलले. त्यासाठी ओबीसी मंत्रालय उभे केले. राज्यातील जाती नियोजनगणना विषय संबंधित राज्याच्या आता सध्या बिहारमध्ये होत असलेल्या जनगणनेच्या धरतीवर अभ्यास करून तोही निर्णय महाराष्ट्र सरकार चर्चनवीत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्यासोबत समन्वय साधून सकारात्मक चर्चा झाल्याने उपोषण सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. एवढे असले तरी अजून खूप काही प्रश्न सोडवायचे आहे त्यासाठी आपली सकारात्मक सहकार्याची भूमिका ठेवावी. ओबीसी समाजासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. मायक्रो ओबीसीनाही कुठलाही अन्याय होणार नाही. मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करून झाल्यावर आज चंद्रपुरात उपमुख्यमंत्री उपोषण स्थळी येऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार बंटी भांगडीया, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबन तायवाडे, महासंघाचे सचिव सचिन राजूरकर, एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, दिनेश चोखारे,राजेेश बेले, गोमती पाचभाई, पप्पू देशमुख  खंनके, डॉ. घाटे . यास सर्व समाजातील ओबीसी समाज बांधव उपस्थित होता.