सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडून वर्ग 3 च्या कर्मचाऱ्याची पाठ राखण
नियमाला धाब्यावर बसवून एकाच कार्यालयात वाजवतात तुन तुने !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांचा माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत दिशाभूल करणारी माहिती असून संबंधित विभागाने कर्मचाऱ्यांची पाठराखण केल्याचे दिसून येत आहे. बदली होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागात 1 एस. वाय. अली वरिष्ठ लिपिक म्हणून त्यांची बदली राजुरा येथे करण्यात आली आहे. तरी पण ते सार्वजनिक बांधकाम विभागात अजूनही कार्यरत आहेत. एस. के. गावंडे वरिष्ठ लिपिक हे सुद्धा याच कार्यालयात काम करीत आहेत. आर. एस. नवलकर वरिष्ठ लिपिक 2015 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर येथे असून त्याची अजूनही कुठे बदली झालेली नाही. जी. एस. क्षिरसागर वरिष्ठ लिपीक यांची बदली 2017 ला सा.बा. उपविभाग जिवती येथे बदली करण्यात आली आहे. परंतु ते अजून याच ठिकाणी काम करित असल्याचे बोलले जात आहे. राकेश दादाजी जनबंधू स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 2008 पासून ते 2014 पर्यंत ते आज पर्यंत सा.बा. उपविभाग क्रमांक एक चंद्रपूर येथेच आहेत. एम डब्ल्यू खेमस्कर वरिष्ठ लिपिक, यांच्याकडे मुल येथील अर्थ लिपिक, ऑडिटर अशा पदाची जबाबदारी असताना ते चंद्रपुरातच अधिकाराच्या आशीर्वादाने काम करून घेत आहेत. या कर्मचाऱ्यांची माहिती अधिकारात समोर आली असता. माहिती अधिकारात सक्षम दिशा भूल करणारी माहिती दिल्या गेली आहे.
एकाच कार्यालयात 6 वर्षाच्यावर राहून तुं तुने वाजवण्याचे काम सुरू आहे.
एकाच टेबलवर अनेक वर्षापासून कार्यालयात काम करीत असेल आणि बदली होवुनही त्याच टेबलवर काम करीत असेल
तर त्या कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारची पाळेमुळे करण्यात वाव मिळत असते.
संबंधित अपीलकर्त्यांनी अपिली घेतली असता. माहिती अधिकारी व्ही. एस. पवार हजर नसल्याने वेळ मारू पणा सहाय्यक अधीक्षक अभियंता अमरशेट्टीवार अपिली अधिकारी यांनी करून घेतली. त्यांच्यासोबत वरिष्ठ लिपिक बांबोडे उपस्थित होते. परंतु सदर माहिती ही माहिती कर्त्याची दिशाभूल करणारी असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. आपण या संदर्भाची वेगळी तक्रार करावे अशी अपिलीकर्त्याला सांगण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली असताना सुद्धा आणि काही कर्मचाऱ्यांची अनेक वर्ष लोटूनही या ठिकाणी बदली होत नाही. या कार्यालयात एकाच ठिकाणी हे कर्मचारी कुठल्या नियमाच्या आधारे काम करतात. त्यांचे मस्टर पट हाजरीचे तपासून पाहिल्यास संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सा.बा. विभागात चाललेला भोंगळ कारभार समोर येईल.
एवढेच नाही तर बदली झालेल्या वर्ग तीन ची रुजू केलेला अहवाल. त्याचा आस्थापनात काम करणाऱ्याची यादी, तसेच वर्ग तीन च्या कर्मचारी यांचे सेवासलग्न विभागीय करण्यात आलेल्या आदेशाची प्रत न देता कार्यालयात रुजू अहवाल अद्याप पर्यंत अप्राप्त असल्याची माहिती देऊन दिशाभूल केली. संबंधित कर्मचारी कोणत्या नियमाने व कशाच्या आधारावर या कार्यालयात काम करतात त्याची तपासणी करून नागपूर आयुक्त कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी चौकशी करावी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन व त्यात होणाऱ्या घरभाळ्याची नियम बाय उचल होत आहे . याची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.