नंदोरी( खुर्द) येथील जि. प. शाळा मोजतोय शेवटच्या घटका , विद्यार्थ्यांच्या जीवास धोका ?




नंदोरी( खुर्द) येथील जि. प. शाळा मोजतोय शेवटच्या घटका , विद्यार्थ्यांच्या जीवास धोका ?

जीर्ण झालेल्या शाळेत केव्हाही होऊ शकतो अपघात

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (भद्रावती) :-
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या भटाळी नंदोरी( खुर्द) गट ग्रामपंचायत येथील नंदोरी (खुर्द) येतील शाळेची दैनीय अवस्था झाली असून शाळा शेवटची घटका मोजतोय.
या शाळेतील विद्यार्थीच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक समस्या असून या शाळेकडे सक्षम प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील गावातील मुखिया , सरपंच शाळेच्या व्यवस्थेकडे नाही तर, स्वतःच्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देतो.
आपल्याच गावातील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकत असताना. या शाळेत 22 विद्यार्थी असून दोन शिक्षकी शाळा आहे. शाळेलाच लागून अंगणवाडी असल्याने किती लहान बालके वीस बावीस बालक अंगणवाडीत येत असतात. गावातील पाणी करण्याचे सोलर पंप एक महिन्यापासून बंद आहे.
जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. गावातील सरपंच या नात्याने संबंधित समस्या बाबत पाठपुरावा करणे अनिवार्य असताना त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असता अनेक समस्याचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे. शाळेत लाईटची व्यवस्था नाही. विद्यार्थ्यांना टॉयलेट व्यवस्था,विद्यार्थ्यांना दूषित प्रदूषण युक्त पाणी वापरण्यास येत आहे. संबंधित शाळा ही मोडकळीच आली असून कुठल्या परिस्थितीत अपघात होण्याचे नाकारता येत नाही.



नंदोरी ते भटाळी जाणारा रस्ता अतिशय दयनीय परिस्थितीत असून या रस्त्यावरून गिट्टी खदान मधील हायवा सतत जात असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.
. हे सर्व होत आहे येथील गिट्टीखदांमध्ये चालणाऱ्या अवैद्य अशा हायवा गाड्यांनी. संबंधित गावातील सर्व बोरिंग ला प्रदूषण युक्त पाण्याचा वापर करावा लागतो आहे. गिट्टी खदान वरील क्रेशर मुळे गिट्टीचे छोटे तुकडे अनेक घरावर येत असतात. एवढेच नाही तर ध्वनी प्रदूषणामुळे ब्लास्टिंग मुळे अनेक घरांना भेगाकेड पडल्या गेले आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांनी यावर वेळीच लक्ष देऊन कारवाई करावी. नंदोरी खुर्द शाळेची व्यवस्था करावी. या गावात मिळणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून नियमित कंट्रोल मिळत नाही.अशी आप बीती त्यांनी माध्यमांना सांगितले. एवढेच नाही तर या गावात दारूचा महापूर वाहतो. सर्रास दारू विक्री या गावात केल्या जाते. परंतु या गावाचे सरपंच आणि पंचायत समिती स्तरावरील संबंधित अधिकारी याकडे जबाबदारीने डोळेझाकपणा करत आहे.
सरपंचाचेच स्वतःचे गिट्टी खेचर , खदानचे कंट्रक्शन असल्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात. संबंधित गावकऱ्यांनी या संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दमदाटी देण्याचाही प्रयत्न होत असतो. त्यांना कामावरून काढण्याची धमकी दिल्या जाते. म्हणून संबंधित गावकरी मुकुट पणे समस्यांना तोंड देत असतात.
म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून या शाळेतील समस्या कडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
अशी मागणी आता गावकरीच करू लागले आहेत.

नंदोरी खुर्द गावातील शाळेबाबत संवर्ग विकास अधिकारी यांना फोन करून विचारणा केली असतास ते म्हणाले की मी याची चौकशी करून संबंधित अहवाल पाठवण्यास ग्रामसेवकाला सांगितले सांगतो.