राजू भैसारे यांनी माझ्यावर केलेले आरोप
खोटे आणि बिन बुडाचे,मानहानी ठोकणार - सरपंच राहुल बोडणे
राजू भैसारे यांची नार्को टेस्ट करा...
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (नवरगाव) :-
आज दिनांक आठ तारखेला नवरगाव येथे सरपंच राहुल बोंडणे यांनी संबंधित पत्रकार परिषद घेऊन आरोपाचे खंडन केले . ते म्हणाले की, राजू भैसारे यांनी दिनांक 4/ 9 /23 ला चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप केले होते. ते तथाकथित संपूर्ण खोटे असून बिन बुडाचे आहेत. मी कुठल्याही प्रकारचे त्याच्याकडे पैसे मागितले नाहीत.राजू भैसारे याची नार्को टेस्ट केल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल. या आरोपाबाबत न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल करणार आहोत.
सविस्तर माहिती याप्रमाणे की,
मौजा नवरगाव तह सिंदेवाही येथील भु क्र 19 या सरकारी जागेतून श्री धर्मानंद नागदेवते आणि लता नागदेवते यांना त्यांची जागा मौजा रत्नपुर भु क्र 983/1 या जागेमध्ये जाण्यासाठी रस्ता देण्यात येऊ नये यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मा तहसीलदार साहेब सिंदेवाही यांना निवेदन दिले.
वर नमुद रा.मा.क. १/ एल एन ए-११/२०२२/२३ मौजा रत्नापूर या प्रकरणात मा. नायब तहसिलदार सिंदेवाही यांचा दि. २७/१२/२०२२ रोजीचा बेकायदेशीर आदेशाचा श्री राजु भैसारे हे गैरफायदा घेऊन त्याच्या * ले-ऑऊटसाठी आवश्यक मंजुरी मिळविण्याचा तसेच भु. क. १९ या जागेच्या मधोमध उत्तर-दक्षिण ९ मिटर रूंदीचा पक्का रस्ता तयार करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करीत आहे. श्री राजु भैसारे यांचा संपूर्ण भु. क. १९ ची जागा बेकायदेशीर रित्या हडप करण्याचा मानस आहे असे दिसुन येते. याच मौजा नवरगाव येथील भु. क. १९ च्या जागेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग सिन्देवाही मार्फत शासकिय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळेही रा.मा.क. १/एल एन ए-११ / २०२२/२३ मौजा रत्नापूर या प्रकरणात मा. नायब तहसिलदार सिंदेवाही यांचा दि. २७/१२/२०२२ रोजीचा आदेश, त्यात नमुद शर्तीनुसार, निष्कीय झालेला आहे. सदर शासकिय कामाशी माझा किंवा ग्रामपंचायत नवरगांवचा काहीही संबध नाही. तसेच मौजा नवरगाव भु. क. १९ ची ही एकमेव सरकारी जागा मौजा नवरगावला उपलब्ध आहे. या जागेचा सार्वजनीक हिताच्या दृष्टीने शासकीय योजनांसाठी वापर करणे आवश्यक आहे. अशा सरकारी जागेतुन खाजगी व्यक्तीला तिच्या वयक्तीक स्वार्थासाठी रस्ता देण्याची तरतुद कुठेही नाही किंवा असा रस्ता देता येत नाही.
अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. संबंधित प्रकरणासंदर्भात गावातील महिला शासकीय जागेवर होत असलेल्या अतिक्रमाबद्दल समोर आले आहेत. त्या म्हणाल्या की सरपंचावर झालेले आरोप बिन बुडाची असून, कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहार झाला नसून, राजू भैसारे यांना या जागेतून जाण्यासाठी रस्त्याची गरज आहे म्हणून त्यांनी असे आरोप केले आहेत. त्यांनी पाडलेले प्लॉट रत्नापूर सांजा मध्ये येतात. ही शासकीय जागा नवरगाव येथील ढोरफोडीसाठी राखीव आहे. ती एकमेव जागा शासकीय खाली असल्याने या जागेवरून रस्ता जाण्यासाठी ही सर्व धावपळ सर सुरू आहे. या शेतजमिनी साठी हंगामी रस्ता आठ फुटाचा देण्यात आला आहे. कुठल्याही व्यवसायिक स्वरूपासाठी या रस्त्याची वहिवाट नाही. संबंधित जागेवर शासनाने ग्रामपंचायतची कुठलीही ना हरकत घेता संबंधित तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू केले आहेत. मग या ठिकाणी ग्रामपंचायत कुठलंही हस्तक्षेत नसताना हे आरोप निराधार आहेत.
या शेतीमध्ये जाण्या येण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता नसल्याने भैसारे यांनी नागदेवते यांना कृषी प्रयोजनाचे खोटे कारण टाकून नायब तहसीलदार यांच्याकडे रस्त्याची मागणीसाठी अर्ज करण्यास लावले होते. या ठिकाणी संबंधित प्लॉट धारकाने व्यावसायिक वापरासाठी रस्ता मिळावा अशी कुनाकडेही मागणी आज पर्यंत केली नाही. मग खंडणीचा प्रश्न येतोच कुठून.
या जागेवर 2008 ला सार्वजनिक हिताच्या दृष्टीने वृक्षारोपण करण्यात आले होते. ते सर्व झाडे यांनी जेसीपी लावून तोडल्या गेले. संबंधित पत्रकार परिषद मध्ये त्यांनी माझेवर यापूर्वी खंडणी संबंधाचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला. सदर आरोप कुठे नसून माझ्यावर कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत गुन्हे दाखल नाहीत असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राजू भैसारे यांची नार्को टेस्ट केल्यास माझ्यावर केलेले आरोप सक्षम प्राधिकरणा सिद्ध केले तर सत्य समोर येईल. राजू भैसारे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर पैसे मागण्याचा आरोप केला माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या विरुद्ध न्यायालयीन मानहानीचा दावा करणार असल्याचे पत्रकार परिषदेतून केला. या वेळी ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य यांची उपस्थिती होती.