... अन् त्या म्हशीच ठरल्या देवदूत, मालकाचे वाचवले प्राण,मालक गंभीर जखमी





... अन् त्या म्हशीच ठरल्या देवदूत, मालकाचे वाचवले
प्राण,मालक गंभीर जखमी

दिनचर्या न्युज :-
सिंदेवाही प्रतिनिधी :_
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडी मेंढा उपवनक्षेञातील घोट येथे वाघाने हल्ला करून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे घोट येथील मोरेश्वर लालाजी कावळे (वय 39 वर्षे) हे नेहमी प्रमाणे आपल्या म्हशी जंगलात चारावयास गेले होते. सायंकाळी च्या सुमारास गावाकडे परत येत असताना वाघाने गुराख्यावर जोरदार हल्ला करून गंभीर जखमी केले.
मालकावर वाघाने हल्ला चढवल्याचे लक्षात येताच सर्व चरत असलेल्या म्हशाने वाघावर हल्ला करत वाघाला पिटाळून लावले.अन् त्या म्हशीच मालकासाठी देवदूतासारख्या धावुन आल्या. मालकाचे प्राण वाचले.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग तांबेगडी मेंढाचे वनपाल बुरांडे व वनरक्षक सोरते यांनी गुराख्यास तातडीने सामान्य रुग्णालय सिंदेवाही येथे भरती केले. सध्या गुराख्यावर उपचार सुरू असून गुराखी गंभीर जखमी आहे.