चंद्रपुरात निघणाऱ्या महामोर्चाला उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांची उपस्थिती, स्थानिकांना रोजगारांचे आश्वासन; मोर्चा स्थगित !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार (GR) राज्यातील सर्व खासगी व सार्वजनिक उद्योगांमध्ये ८०%% रोजगार स्थानिक भूमिपुत्रांना देणे बंधनकारक असताना. अत्यंत खेदाची बाब म्हणजे, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचे चित्र आज पूर्णपणे उलटे झाले आहे. "जमीन आमची, पाणी आमचे, हवा-पर्यावरण दूषित आमचे आणि नोकरी मात्र बाहेरील लोकांना।" अशी आपल्याकडून भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या जिल्ह्यातील सुपीक जमिनी, शेती आणि गावे खदाणी व उद्योगांसाठी संपादित केल्या जात आहेत. प्रदूषणाचा, आजारपणाचा आणि विस्थापनाचा नरकयातनादायी त्रास स्थानिक जनता सहन करत आहे, पण रोजगाराची वेळ येते तेव्हा स्थानिक तरुणांना डावलून उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा येथून हजारो परप्रांतीय कामगार आणून भरती केले जात आहेत.
या अत्यंत गंभीर अन्यायाविरोधात आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी महामोर्चाचे आयोजन
आज गांधी चौक येथून स्थानिक लोकअधिकार सेना शिवसेना यांच्या वतीने स्थानिक भूमिपुत्राच्या हक्कासाठी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.
मात्र सरकारच्या वतीने स्वतः उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत हे स्वतः चंद्रपुरात हजर झाल्याने त्यांनी मोर्चेकरांच्या मागण्या मान्य करत येता सात दिवसात मंत्रालयात या विषयावर बैठकीचे आयोजन करण्याचे सांगितले. या जिल्ह्यात एमआयडीसी परिसरात बेरोजगारांसाठी स्किल सेंटर उभे करणार असल्याची त्यांनी सांगितले. स्थानिकांना जिल्ह्यात रोजगाराची हमी असे आश्वासन देऊन सभेला संबोधित करून मोर्चाला स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले एवढेच नाही तर स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांना सुद्धा कान पिचक्या दिल्या कुणी पक्षाच्या नावाने कंपनीत वसुली केली, किंवा त्याचा गैरफायदा घेतल्यास तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी असेही आवर्जून आपल्या भाषणातून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. मोर्चासाठी जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते गांधी चौकात जमा झाले होते. या मोर्चाचे रूपांतर गांधी चौकात सभेत होऊन मंत्र्याच्या आश्वासन आश्वासन स्फूर्ती नंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. या महामोर्चाचे आयोजन स्थानिक लोकअधिकार सेना जिल्हाध्यक्ष गोमतीताई पाचभाई यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. यावेळी मंचावर अध्यक्ष-महासंघ गजानन कीर्तिकर,शिवसेना नेते,माजी खासदार,कार्याध्यक्ष-महासंप डॉ. श्रीकांत शिंदे,सरचिटणीस-महासंघ अरुण मोरे,शिवसेना नेते, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक नोपानी
यांची उपस्थिती होती.
