कथित मुख्य सूत्रधार जाळ्यात अडकला ! बनावट पदव्याचे लाभार्थी येणार गोत्यात ?



कथित मुख्य सूत्रधार जाळ्यात अडकला !
बनावट पदव्याचे लाभार्थी येणार गोत्यात ?


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरात बोगस पदव्या विकणाऱ्या भामट्यांच्या मोठ्या रॉकेटचा दुर्गापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
नोकरी, महाविद्यालयातील प्रवेश आणि पदोन्नती मिळवून देण्याच्या नावाखाली लाभार्थ्याकडून पाच ते दहा लाख रुपयात पाच नामांकित विद्यापीठाची बनावट पदव्या, प्रमाणपत्र, गुणपत्रिका, मायग्रेशन सर्टिफिकेट तयार करून त्याची लाखो रुपयात विक्री करणाऱ्या रॉकेटचा चंद्रपूर येथील दुर्गापुर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यातील कथित मुख्य सूत्रधार परिमल गौरकरला नागपुरातून अटक करण्यात आली. या प्रकरणात आता पर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रासह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मात्र आता या बोगस पदव्या घेणाऱ्या लाभार्थ्यांचे लवकरच बिंग फुटणार आहे? आरोपींनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, श्रीधर विद्यापीठ( पिलानी राजस्थान) गोंडवना विद्यापीठ( गडचिरोली), छत्रपती शाहू महाराज विद्यापीठ( कानपूर) अशा विविध विद्यापीठाच्या बनावट शैक्षणिक कागदपत्रे बनवून, त्याचे सही शिक्के तयार करून ही प्रमाणपत्रे पाच ते दहा लाख रुपयापर्यंत विकली जात होती. ही प्रमाणपत्रे शासकीय नोकरी मिळवण्यासाठी, नोकरीतील पदोन्नतीसाठी विकल्याचा गंभीर आरोप आहे.
आता तपासात संबंधित विद्यापीठाच्या बनावट पदव्या व गुणपत्रिका कुणाला विकल्या याचा पर्दाफाश पोलिसांकडून केल्या गेल्यास नोकरीतील तसेच मोठमोठ्या महाविद्यालयातील बोगस पदवीधारक गोत्यात आल्यास त्यांचे पितळ उघडे होणार आहेत?
सध्या सूत्राच्या माहितीनुसार शहरात चर्चा असून मुख्य सूत्रधाराला अटक झाली तेव्हापासून दबक्या आवाजात बनावट पदवी धारण करणाऱ्या नोकरीदार आणि मोठमोठ्या  विद्यालय, महाविद्यालयात  चांगलीच धास्ती भरल्याची  चर्चा होत आहे.
सदर बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जात होते यासाठी माहिती कुठून मिळत होती, आणि ही प्रमाणपत्रे कुणाकुणाला विकण्यात आली ही सर्व  माहिती चौकशीत समोर  येईल.
बनावट पदव्यांची रॅकेट  पोलिसांच्या हाती लागताच  शहरातील कोण याचे लाभार्थी? किती मासे जाळ्यात अडकतील! अशी चर्चा आता होत आहे!