... या तालुक्यात ग्रामसेवक लटकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !




... या तालुक्यात ग्रामसेवक लटकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !

देवानंद मुर्लीधर गेडाम, ग्रामसेवक, उमरी पोतदार ता. पोंभुर्णा जि. चंद्रपुर यांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
तक्रारदार हे मौजा उमरी पोतदार ता. पोंभुर्णा जि. चंद्रपुर येथील रहीवासी असून तक्रारदार यांनी ग्रामपंचायत उमरी पोतदार येथे १५ व्या वित्त आयोगामधुन सन २०२१-२०२२ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपुर अंतर्गत योगा शेड बांधकामांचे काम अंदाजे किं. ३,४९,३२१ /- रू. चे काम केलेले लागलेल्या मटेरिअल व साहित्याचे पुरवठा चे होते. सदर योगा शेड बांधकामाकरिता लागलेल्या मटेरिअल २,४४,५२५ /- रू चे बिल ग्रामसेवक श्री देवानंद गेडाम यांनी काढुन दिल्यानंतर तक्रारदार यांनी उर्वरित मजुरांची रक्कम काढुन देण्याकरिता ग्रामसेवक देवानंद गेडाम यांना भेटले त्यांनी योगा शेड बांधकामावर अंदाजे किं. ३,४९,३२१ /- रू. या कामांवर पाच टक्के प्रमाणे १७,५००/- रू. ची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी देवानंद मुर्लीधर गेडाम, ग्रामसेवक, उमरी पोतदार यांना लाच देण्याची त्यांची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांचेविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून आज दिनांक ०६/१०/२०२३ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी देवानंद मुर्लीधर गेडाम, ग्रामसेवक, उमरी पोतदार यांनी झालेल्या कामाचे पाच टक्के प्रमाणे १७,५००/- रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती १३,००० /- रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून ग्रामपंचायत कार्यालय उमरी पोतदार येथे पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी देवानंद मुर्लीधर गेडाम, ग्रामसेवक, उमरी पोतदार यांना १३,००० /- रु. लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही श्री राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.
नागपुर, श्री. संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक श्रीमती
मंजुषा भोसले ला. प्र. वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, तसेच कार्यालयीन
स्टॉफ ना. पो. अ. संदेश वाघमारे, पो. अं राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम यांनी यशस्वी
पार पाडली आहे.
चंद्रपुर जिल्हयांतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, त्यांच्याकडे कोणत्याही शासकिय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी ईसम (एजंट) कोणतेही शासकिय काम 'करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.