खनिक कर्म अधिकारी नैताम हे जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननला जबाबदार?
भद्रावती तालुक्यातील मौजा तिरवंजा येथील अवैध गौण खनीज उत्खनन प्रकरणी कुकडे यांची कारवाईची मागणी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यात जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या माध्यमातून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर प्रतिबंध लावण्याचे अधिकार असताना व जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश दिले असतांना या दोन्ही अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णता दुर्लक्ष असुन गौण खनिज उत्खनन ची परवानगी देणाऱ्या जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम हे लीज धारकाकडून हप्ते घेऊन त्यांना अतिरिक्त गौण खनिज उत्खननाची जणू परवानगीचं देत असतात.
आरटीओ गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची एन्ट्री च्या नावाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या अधिनस्त कर्मचारी व एजंट दर महिन्याला वसुली करत असल्याने अवैध गौण खनिज चोरीचा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातं आहे.
जिल्ह्यातील ह्या दोन अधिकाऱ्यांची प्रामाणिक पणाची मिशाल कायम आहे ? जिल्ह्यातून रेती, मुरूम, ओव्हरलोड वाहतूक, एवढी मोठी अवैद्य गौण खनिज उत्खननाची चोरी होत असताना. या संदर्भाची माहिती या अधिकाऱ्यांना नाही? ही एक जिल्ह्यासाठी शोकांतिका आहे!
भद्रावती तालुक्यातील मौजा तिरवंजा (मोखाला) व तिरवंजा (चेक) अशा दोन ठिकाणातील जवळपास एक किलोमीटर परिसरात लाखों ब्रॉस गौण खनीज उत्खनन शामकांत थेरे व त्यांच्या साथीदारांनी केले त्यात भद्रावती तहसीलदार सोनुने, नायब तहसीलदार भान्दककर आणि मंडळं अधिकारी व पटवारी हे सुद्धा दोषी असल्याने या सर्वांवर निलंबणाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी निवेदन देऊन केली आहे.
काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अवैध गौण खनिज यावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्यास खनिकर्म विभागाने पोलिस आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाला सोबत घेऊन अचानक तपासणी करावी, असे आदेश दिलेले असतांना जिल्ह्यात कित्तेक ठिकाणी अवैध गौण खनीज उत्खनन व त्याची वाहतूक होतं आहे, मात्र जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पटवारी यांच्या माध्यमातून कुठलीही कार्यवाही होतांना दिसत नाही, उलट त्यांच्या माध्यमातून अवैध गौण खनीज उत्खनन करणाऱ्या टोळीचे सरक्षण केल्या जाते,
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून खनीज वाहतूक केली जाते व खनिजाची वाहतूक करतांना ट्रांझिंट पासची आवश्यकता असतांना ती नसते. मात्र वेकोली करीता हा अपवाद असला तरी वाहतुकीसाठी त्यांचा रोड मायनिंग प्लान असायला हवा. त्यामुळे अवैध वाहतुकीबाबत खनीकर्म विभाग, पोलिस विभाग आणि उप-प्रादेशिक विभागाने अचानक तपासणी करावी. खनीजाचा कोणताही साठा आणि डीलरशीपसाठी नोंदणी आवश्यक आहे.सोबतच अवैध वाहतूक वेगळ्या मार्गाने होत आहे का आणि अधिकृत मार्गाने होणा-या वाहतुकीची वजनमर्यादा किती आहे, ते तपासावे. वनविभागाच्या खुल्या जागेवर अवैध खनीज साठा आढळल्यास त्याची वनविभागाने तपासणी करावी. जिल्ह्यात अवैध खनीज उत्खनन व अवैध वाहतुकीवर प्रतिबंध करण्यासाठी संबंधित विभागाने गांभिर्याने कार्यवाही करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नसून भद्रावती व वरोरा या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनीज उत्खनन होतं आहे. व दोन्ही तालुक्यातील गिट्टी खदानी मर्यादेपेक्षा जास्त खणल्या जात आहे,
मौजा तिरवंजा येथील लाखों ब्रॉस गौण खनिज अवैधरित्या उत्खनन करण्यात आले त्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, भद्रावती तहसीलदार सोनुने, मंडळं अधिकारी वाटेकर व पटवारी अनामिका भगत यांच्यावर त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी निलंबणाची कार्यवाही करावी जेणेकरून कुणी सरकारचा गौण खनिजची चोरी करण्यास अधिकारी समर्थन करणार नाही, कारण जिथे अधिकारी मैनेज असतो त्या परिसरातूनचं गौण खनिज चोरी होतं असतें, त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेऊन वरोरा भद्रावती परिसरातील अवैध गौण खनिज उत्खनन व गिट्टी खदान मधील उत्खनन ड्रोन कैमेरे लावून मोजमाप करावे व सर्वावर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या महसूलाची चोरी कारण्याऱ्याना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा प्रशासनाविरोधात अभिनव आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.