दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा, जि. चंद्रपूर द्वारा दरवर्षीप्रमाणे यावर्षी *दि. 26/11/2023* ला ठिक सकाळी 10 ते ५ वाजेपर्यंत *गौरव सेलिब्रेशन सभागृह, नागपूर रोड, विद्यानिकेतन पब्लिक हायस्कुलजवळ, नागपूर रोड, चंद्रपूर* येथे दिव्यांग (अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर) बांधवांच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष-* मा. श्यामबाबूजी पुगलिया, ज्येष्ठ समाजसेवक, चंद्रपूर
*उद्घाटक*- गौतमबाबू कोठारी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भारतीय जैन संघटना
विवाह संस्था ही समाज निर्मितीत तथा समाज बांधणी करण्यात महत्वाची संस्था आहे. प्रत्येक व्यक्तीकरिता त्याचा जोडीदार जन्मास येतो. परंतु त्याचा शोध घेणे तेवढेच जिकरीचे कार्य आहे. विवाहयोग्य मुलीच्या बापाच्या पायातील चपला जिझतात पण योग्य जोडीदार मिळत नाही. त्यातच उपवर-वधू दिव्यांग असेल तर परिक्षा जास्त कठीण होते. आज समाजात अशा प्रकारच्या विवाह जोडणीकरीता अनेक व्यावसायिक संस्था मेट्रोमोनीच्या माध्यमातून काम करते आहे. परंतु दिव्यांग बांधवांच्या विवाह जोडणीकरीता कोणत्याही संस्थेचे नाव ऐकण्यात नाही.
आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा मागील 20 वर्षापासून *“स्व. गौरवबाबु पुगलिया संगणीकृत दिव्यांग वधू-वर सूचक केंद्रा”* च्या माध्यमातून हे अनोखे कार्य करीत आहे. सदर संस्थेतील सर्व कार्यकर्ते तथा पदाधिकारी पुज्य बाबा आमटे द्वारा संस्थापित आनंदवन येथे दिव्यांगांच्या शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य व व्यावसायिक पुनर्वसनाकरिता व्यावसायिक म्हणून कार्यरत असल्याने दिव्यांग बांधवांच्या वैयक्तिक व सामाजिक समस्येचा संपूर्ण अभ्यास करणारे आहेत. याचेच फलित मी संस्थेला मागील 20 वर्षात 400 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांचे विवाह जोडून त्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजनातून विवाह लावून देण्यात यश मिळाले आहे. तथा सर्व जोडपी यशस्वीरित्या आपले वैवाहिक जीवन जगत आहे. आज तेच दिव्यांग बांधव या संस्थेच्या यशस्वी कार्यात कार्यरत असून दिव्यांग बांधवांचे विवाह जोडण्याकरिता संस्थेला मदत करीत आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयकुमार पेचे व सचिव श्री. महेश भगत यांनी सदर आयोजित मेळाव्यात दिव्यांग बांधवांनी संपूर्ण कागदपत्रासह निर्णय प्रक्रियेत सहकार्याकरीता पालकांनी आपल्या दिव्यांग पाल्यासह उपस्थित राहून विवाह जोडण्याच्या या सामाजिक कार्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
सदर मेळाव्याकरिता भारतातील इतर 3 राज्यासह आजवर 128 दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली आहे.
आपण यांना संपर्क . संजय पेचे, अध्यक्ष 7020328769श्री. महेश भगत सचिव 7020328769 करावे.