दुबई येथे वर्ल्ड कार्डिओलॉजि कॉन्फेरेन्स मध्ये डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे सादर करणार संशोधन




दुबई येथे वर्ल्ड कार्डिओलॉजि कॉन्फेरेन्स मध्ये डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे सादर करणार संशोधन


दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

जगातील प्रतिष्ठित 3rd International Cardiology Conference येत्या 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत दुबई (UAE) इथे आयोजित करण्यात आलेली आहे.

या अत्यंत प्रतिष्ठित जागतिक हृदयरोग परिषदेमध्ये जगातील प्रसिद्ध cardiologist, Cardiac सर्जन व हृदयरोग निगडित तज्ञ आपले उल्लेखनीय शोध प्रबंध सादर करणार आहेत. या जागतिक परिषदेत आपल्या चंद्रपूरचे प्रसिद्ध Disease Reversal एक्स्पर्ट आणि Preventive Cardiologist डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे यांना Heart Reasercher म्हणून हृदयरोग हा विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचारांनी आणि जीवन शैलीत बदल करून नैसर्गिकरित्या रिव्हर्स होवू शकतो. हे चंद्रपूरच्या हृदय रुग्णांवर केलेले संशोधन जागतिक पटलावर सादर करण्याकरीता विशेष आमंत्नित करण्यात आलेले आहे.

विशेष म्हणजे या काँफेरेन्स मध्ये 48 जागतिक हृदयरोग संशोधक नवनवीन औषधे, तपासण्या व शस्त्रक्रिया या विषयावर संशोधन सादर करणार आहेत. त्यात हृदयरोग पूर्णपणे Reverse होऊन रुग्ण औषधीमुक्त, भयमुक्त व उच्च दर्जाचे जीवन जगता येते असा संशोधन सादर करणार डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे हे जगातील एकमेव आयुर्वेद तज्ञ आहेत..

चंद्रपूरच्या इतिहासात हि गौरवास्पद बाब असून चंद्रपूरच्या आरोग्य क्षेत्नात मोठी उपलब्धि आहे. डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे यांची हि अत्युच्च उपलब्धि सर्व समव्यवसाय बंधू, आरोग्य साक्षर समाज बांधव आणि मित्न व हितचिंतक याच्या करिता आनंद आणि हर्ष निर्माण करणारी आहे.

अशी माहिती एका पत्नकाद्वारे सामाजिक आरोग्य विभाग माधवबाग चंद्रपूर यांच्या वतीने प्रसिध्दी माध्यमांना देण्यात येत आहे.