18 डिसेंबरला आयटकचा नागपूर विधान भवनावर विराट मोर्चा




18 डिसेंबरला आयटकचा नागपूर विधान भवनावर विराट मोर्चा

चंद्रपुरात 14 डिसेंबरला बाईक रॅली.....

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र राज्य कौन्सिल यांच्यावतीने दिनांक 18 डिसेंबर 2023 ला नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा लाखोच्या संख्येने विविध मागण्या घेऊन धडकणार आहे.
देशातील मोदी सरकार हटाव, महाराष्ट्र सरकार हटाव
हा मुख्य नारा घेऊन 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2023 कोल्हापूर ते नागपूर राजश्री शाहू महाराज जन्मभूमी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी असा राज्यवापी महासंघर्ष यात्रा आयटक च्या वतीने काढण्यात आली आहे. त्या यात्रेची चंद्रपूर जिल्ह्यात भव्य स्वागत बाईक रॅली विराट मोर्चा व जाहीर सभा दिनांक गुरुवार 14 डिसेंबरला जिल्हाधिकार्यालय समोर भव्य सभा होणार आहे.
18 डिसेंबरला नागपुरात होणाऱ्या महामोर्चात भाजप हटाव.. देश बचाव.. संविधान बचाव ..कामगार बचाव.. देश बचाव! अशा प्रकारचे केंद्र आणि राज्य सरकारने कामगार, शेतकरी भूमिहीन व सर्व सामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले. ही मागणी घेऊन विविध क्षेत्रातील कोट्यावधी कामगारांना संघटित करून सर्व संघटित संघटनाच्या नेत्यांना प्राचारण करून या महामोर्चात उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. अशी माहिती आज श्रमिक पत्रकार परिषदेत राज्य सचिव विनोद झोडगे, एन.टी मस्के, दिलीप बर्गी, प्रकाश वानखेडे, रवींद्र उमाटे, चिताळे, मोहुले, सविता गटलेवार, यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली.
ते म्हणाले 18 डिसेंबरला  राज्यातील  लाखोच्या संख्येने  कामगार, शेतकरी, कष्टकरी,  बेरोजगार, नागपूर येथील अधिवेशनात शामिल होण्याचे  होणार असून. आपल्या संविधानिक मागण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
 स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले नाहीत उलट दिवसेंदिवस ते अधिक गंभीर होत चालले आहेत. सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात राज्यव्यापी महा संघर्ष यात्रा नागपूर विधान भवनावर धडकणार आहे.यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हानही पत्रकार परिषदेतून केले आहे.