मुमक्का सुदर्शन चंद्रपूरचे नवीन पोलीस अधीक्षक




मुमक्का सुदर्शन चंद्रपूरचे नवीन पोलीस अधीक्षक

रवींद्र सिंग परदेशी यांची परभणी येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राज्यात अनेक अनेक ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहेत. यात खास करून चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांची परभणी पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांचे ठिकाणी नागपूर शहर पोलीस उपयुक्त कार्यालयातील मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षापासून अनेक वाढते गुन्हेगारीत परदेशी यांना तारेवरची कसरत करावी लागली. याच काळात जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी क्षेत्रात फार मोठ्या घडामोडी झाल्या पोलीस अधीक्षक परदेशी यांना जिल्ह्यात फारसे काही कंट्रोल केल्याचे दिसून आले नव्हते.
नागपूर शहर येथून पोलीस उपयुक्त कार्यालयात मुंमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. चंद्रपुरातील वाढत्या गुन्हेगारीकडे नवीन पोलीस अधीक्षक आळा घालतील का याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहेत.