ग्रामपंचायत संगणक परीचालकांनी पुकारले राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनग्रामपंचायत संगणक परीचालकांनी पुकारले राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना चंद्रपूर जिल्ह्यात बारा वर्षापासून शासन स्तरावर काम करीत आहे. मात्र 2011 पासून संगणक परिचालक म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत असलेल्या परिचालकांना तुटपुंज्या मानधनावर करावे लागत आहे. एवढ्याशा मानधनावर परिवाराच्या खर्च करणे कठीण आहे.
म्हणून शासनाने यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृती बंधामध्ये संगणक परिचारक( डेटा एन्ट्री ऑपरेटर) म्हणून पद निश्चिती करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन लागू करावा. मागणी पूर्ण होईपर्यंत या शासकीय प्रक्रियेला वेळ लागत असल्यास सध्या किमान वीस हजार रुपये मासिक मानधन संगणक परिचारकांना देण्याची मागणी आज पत्रकार परिषदेतून संघटनेचे अध्यक्ष प्रशांत डवले, सचिन पाल, मोहना धोटे, विकास ढोके, राजेश वाडगुरे, राखी घुगुसकर, अर्चना रायपुरे, प्रतीक लोढे, अनिल कष्टी, यांनी केली.
13 नोव्हेंबर 2023 पासून 48 दिवसापासून जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायत च्या कार्यालयातील कार्यरत संगणक परिचालक काम बंद आंदोलन सहभागी आहेत.
आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारले असून गेल्या बारा वर्षापासून या मागण्यासाठी शासन दरबारी वारंवार विनंती करून सुद्धा सरकार लक्ष देत नसल्याने नाईलाजास्व बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. एवढे असूनही कुठलेही मासिक मानधन शासन स्थळावर वाढवल्या जात नाही.
शासनाच्या ऑनलाइन असलेल्या कामात ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासन यांच्या आदेशाने नेहमी कार्यरत असलेला परिचालक सर्व बाबीतील तांत्रिक कामे करून घेतो.
शासन स्तरावर साडेबारा हजार मानधनावर असलेला संगणक परिचारक मात्र अर्ध्या अर्धी साडे सहा हजाराच्या मानधनावर काम करीत आहे.
 सध्या ग्रामपंचायत वर संगणक  परिचालकाचे काम बंद असल्याने ग्रामपंचायत स्तरावरील जनतेला अनेक समस्येला सामोर जावे लागत आहे.
 अशा  बिकट परिस्थितीत परिचालकाने काम करणे ,दबावाला घाबरून व कंटाळून  विकृत असे  पाऊल उचलल्यास चे सर्वस्वी जबाबदार प्रशासन शासन व संबंधित कंपनी असेल. म्हणून या सर्व समस्यांचा तोडगा लवकरात लवकर शासनाने काढावे व महाराष्ट्र राज्य संगणक  परिचालक संघटना  लवकरात लवकर न्याय द्यावे अशी मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून केली.