अस्तित्वासाठी झुंजीत दोघांचाही अखेर शेवट





अस्तित्वासाठी झुंजीत दोघांचाही अखेर शेवट

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रातील झरी उपक्षेत्र कक्ष क्रमांक ३३८मधील पानघाट कुटी परिसरात दोन वाघांचे मृतदेह सोमवार २२ जानेवारी रोजी सकाळी आढळल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. एकाचवेळी आणि जवळजवळच दोन वाघांचे मृतदेह आढळण्याची ही पहिलीच वेळ असावी. अस्तित्वासाठी झुंजीत दोघांचाही अखेर शेवट,
एकमेकांच्या झुंजीत या दोन्ही वाघांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
उपक्षेत्र झरी कक्ष क्रमांक ३३८ पानघाट कुटी परिसरातील खातोडा तलाव क्षेत्रात गस्तीवर असलेल्या वनरक्षकास दोन वाघांचे मृतदेह आढळून आले. एका वाघाचे अंशता मांस भक्षण केलेले आढळून आले आहे. तर पूर्णपणे शाबूत असलेला वाघ हा टी १४२ नर असून अदाजे त्याचे वय ६ ते ७ वर्षे आहे. वर्षे आहे. कमी वयाचा दुसरा वाघ हा टी-९२
या वाघीणीचा मादी बच्चा असून, अंदाजे वय २ वर्षे आहे. २० ते २१ जानेवारीच्या रात्री झालेल्या झुंजीत गंभीर दुखापत झाल्याने या दोन वाघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. परिसराची कॅमेरा ट्रॅपच्याद्वारे अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे.
दोन्ही वाघांचे मृतदेह टीटीसी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदना दरम्यान दोन्ही वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल. मृतक वाघाचे नमुने डीएनए चाचणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. पंचनामा करताना कोरचे उपसंचालक नंदकिशोर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कोळसा रुदंन कातकर, इको-प्रोचे बंडू धोतरे, एनटीसीए प्रतिनिधी व डब्लूपीएसआयचे मुकेश भांदककर, वन्यजीव संशोधक क्रिष्णन, ताडोबाचे वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकारी खोब्रागडे व जीवशास्त्रज्ञ यशस्वी राव आणि क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.