मनपा झोन एकचे कनिष्ठ लिपिक शेख लाचलुपत विभागाच्या जाळ्यात अडकले acb chandrapur




मनपा झोन एकचे कनिष्ठ लिपिक शेख लाचलुपत विभागाच्या जाळ्यात अडकले

फारूख अहमद मुस्ताक अहमद शेख, कनिष्ठ लिपीक, महानगरपालीका झोन १, संजय गांधी बिल्डीग चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर यांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
तक्रारदार हे चंद्रपुर येथील रहिवासी असुन त्यांनी चंद्रपुर महानगरपालीका अंतर्गत स्वतःचे नावे व मुलाचे नावे दोन फ्लॅट घेतलेले असुन सदर मालमत्तेवर त्यांचे व मुलाचे नाव भोगवटदार म्हणुन समाविष्ट होणेकरीता तकारदार यांनी महानगरपालीका झोन १, संजय गांधी बिल्डीग चंद्रपुर येथे अर्ज दिला असता महानगरपालीका झोन क १ मधील कर लिपीक नामे फारूख अहमद मुस्ताक अहमद शेख वय ५२ वर्ष यांनी तक्रारदार यांना दोन्ही मालमत्तेवर भोगवटदाराचे नावे समाविष्ट करून देणेचे कामाकरीता १५,०००/- रू. ची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी फारूख अहमद मुस्ताक अहमद शेख, कर लिपीक, महानगरपालीका झोन १, संजय गांधी बिल्डींग चंद्रपुर यांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांचेविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक २२/०२/२०२४ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी फारूख अहमद मुस्ताक अहमद शेख, कर लिपीक, यांनी १५,०००/-रु. लाचेची मागणी करून आज दिनांक २३/०२/२०२४ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी फारूख अहमद मुस्ताक अहमद शेख, कर लिपीक, महानगरपालीका झोन १. यांना १५,०००/- रु. लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही मा.श्री. राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नागपुर, मा. श्री. संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक श्रीमती मंजुषा भोसले ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, तसेच कार्यालयीन स्टॉफ सफौ रमेश दुपारे, पोहवा अरूण हटवार, नरेश नन्नावरे, राज नेवारे, ना.पो.अ. संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, पो.अं. वैभव गाडगे, चालक पोशी सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.