पोलीस अधीक्षकांनी स्वतः धाड टाकून रेती तस्करांची कोटीची मालमत्ता केली जप्त




पोलीस अधीक्षकांनी स्वतः धाड टाकून रेती तस्करांची कोटीची मालमत्ता केली जप्त

हायवा, पोकलेन मशीन सह दिड कोटीचा मुद्देमला जप्त

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मा. श्री. मुम्मका सुदर्शन, यांनी अवैध्य रेती चोरीवर आळा घालण्या करीता धडक मोहिम हाती घेतली आहे.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दि.20/03/2024 रोजी रात्रो दरम्यान मा. पोलीस अधीक्षक साहेब यांना विश्वसनीय सुत्राकडून खात्रीशीर खबर मिळाली की, मौजा अजयपुर गोंडसावरी अंधारी नदीपात्रात ट्रकमध्ये अवैध्यरित्या रेती चोरी सुरू आहे. अशाखबरे वरून पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः पथकासह खाजगी वाहनाने अजयपुर गोंडसावरी अंधारी नदी रेती घाटावर जावून पाहणी केली असता रोडवर संशईतरित्या एक बोलेरो पिकअप गाडी क्र. MH34BF 1809 हि दिसून आली गाडीमध्ये मोहम्मद शाहरूख इसराईल शेख वय 36 वर्षे रा.संजय नगर चंद्रपूर निळून आला. त्यास सोबत घेवून अंधारी नदीचे पात्रात गेले असता रेती भरून असलेले 3 हायवा ट्रक दिसून आले. पोलीसांची चाहूल लागल्याने तिन्ही हायवा ट्रक चालकांनी त्यांचे ताब्यातील हायवा ट्रक मधील रेती नदी पात्रात रिकामी केली. हायवा ट्रक क्र. 1) MH34BG5852 2) MH34BG0585 3) MH34BG5861 4) रेतीचे उत्खनन करीता वापरलेले एक KOBELCO कंपनी ची पोकलैंड मशिन मिळून आली मशीन चालक नामे आकाश गावंडे रा. गोंडसावरी हा अंधाराचा फायदा घेवून पळुन गेला.
स्वतः धाड टाकून रेती तस्करांची कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यामुळे जिल्ह्यात रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. जिल्हा रेती तस्करीला आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षकांनी चांगलीच मोहीम हाती घेतली आहे. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेती घाटावर जाऊन कारवाई करण्याची कदाचित जिल्ह्यात ही पहिली वेळ असेल?
नमुद तिन्ही हायवा, बोलेरोगाडी, पोकलॅन्ड मशीन चे चालकाने अंधारी नदी पात्रातून रैती गौण खनिजाचे उत्खनन करून 1) नमुद 3 हायट्रकमध्ये प्रत्येकी 8 ब्रास अ.कि.5000/- रू. असा एकूण 24 ब्रॉस 1,20,000/-रू.ची रेती चोरी करून 2) तिन हायवा ट्रक प्रत्येक हायवा 25,00,000/-रू. असे 75,00,000/-रू., 3) बोलेरो पिकअप अ.कि. 5,00,000/-रू. 4) पोकलैंड मशीन अ.कि. 70,00,000/-रू. असा एकूण 1,51,20,000/-रु.चा माल जप्त करण्यात आला.

नमुद प्रमाणे रेती व रेती चोरी करीता वापरलेले वाहने पंचासमक्ष जप्त करून आरोपी नामे 1) बोलेरो चालक नामे मोहम्मद शाहरूख इसराईल शेख वय 36 वर्षे रा.संजय नगर चंद्रपूर 2) हायवा चालक नामे श्रावणकुमार लालुप्रसाद पाल वय 28 वर्षे रा.छोटा शिवमंदीर वार्ड, चंद्रपूर 3) हायवा चालक नामे सुनिल लक्ष्मण जांगडे वय 39वर्षे रा.मातानगर वार्ड, चंद्रपूर 4) हायवा चालक नामे सफन सहादेव समाजपती वय 54 वर्षे रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर 5) पोकलैंड मशीन चालक नामे आकाश गावंडे रा. गोंडसावरी ता.मुल जि. चंद्रपूर यांचे विरूद्ध पो.स्टे.मुल जि.चंद्रपूर येथे अप.क्र. 118/2024 कलम 379, 34 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून

पुढील तपास पो.स्टे. मुल पोलीस करीत आहे.