यंग चांदा ब्रिगेडचे मनोमिलन, महायुतीची उमेदवारी पक्की ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला तेव्हापासून चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या संपर्कात दिसले नव्हते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मोरवा येथे झालेल्या सभेमध्ये किशोर जोरगेवार यांची उपस्थिती दिसली. त्यानंतरही काही दिवस ते स्तब्ध राहिले. त्यानंतर शहरांमध्ये मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे आवागमन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गटाचे नेते छगन भुजबळ, यांनी किशोर जोरगेवार यांच्या घरी भेट घेऊन पत्रकार परिषदेचे आयोजन केले. त्यात त्यांनी महायुतीला पाठिंबा असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी. येऊन पुन्हा किशोर जोरगेवार यांची मनधरणी केली. असे दिसून आले की या मनोमिलनातून 2024 च्या विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून किशोर जोरगेवार यांना उमेदवारी तर निश्चित तर नाही ना? असा प्रश्न आता जनतेत चर्चिला जात आहे. पण किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरकरांना 2019 च्या निवडणूकीत दिलेल्या 'त्या 'आश्वासनाचे काय?
त्यानंतर आमदार जोरगेवारांनी प्रचाराच्या शेवटच्या एक दिवसा अगोदर शकुंतला लाँन मध्ये यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्ताचा मेळावा आयोजित केला. त्या कार्यक्रमात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना प्रचारार्थ आमंत्रित करून मागील 10 वर्षात असलेली कटूता संपुष्टात आणली. गुरु शिष्याचे असलेले नाते पुन्हा उद्यायस आले. बराच वेळ एकमेकांच्या कानात कुजबूज सुरू होती.
किशोर जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांचे तोंड भरून कौतुक केले. जुन्या आठवणी विसरून पुन्ना सुधीर मुनगंटीवारच्या प्रचारअर्थ यंग चांदा ब्रिगेड भरभक्कम पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मला विश्वास आहे की, चंद्रपूर मध्ये विकासाची खूप ताकत असून ही ताकद जगाला दाखवण्याची उत्तम संधीआहे. मुनगंटीवार हे केवळ चंद्रपूरचे नाही तर राज्याच्या विकासाचे ब्लू प्रिंट आहेत. असे कौतुकास्पद संभाषण केले.
या दोन गुरु शिष्याचे मनोमिलन झाल्याने पक्षात असलेल्या भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्याच्या उमेदवारीचे काय ? विधानसभेसाठी आमदारकीच्या डोहाळे लागलेल्या त्या भाजप कार्यकर्त्यांचे काय? एकंदरीत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पाण्यावर काठी मारली तरी पाणी पुन्हा एकत्र येते, त्यामुळे हे नाते जसेच्या तसे असतात.
पण परस्पर विरोधी असलेल्या त्या नेते बद्दल अनेक कार्यकर्त्यांनी आपापसात हातापायी केले होते. मग अब्दुल कलाम आझाद बगीचा असो, की मुख्य लावलेल्या बॅनर बाजी वरून असो, असे अनेक संघर्ष कार्यकर्त्या झाल्याचे दिसून आले होते. त्या कार्यकर्त्यात अजूनही संभ्रम तर नाही ना? नेते एकत्र येतात, कार्यकर्ते लढत असतात!
यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांची कुचंबना होत असल्याची चर्चा आता कार्यकर्त्यात होऊ लागली आहेत.
पुन्हा एकदा आम्ही मिळून काम करू. अनेक वर्ष काम मिळून केले. यावेळेस यंग चांदा ब्रिगेडने मदत केल्यास याची परतफेड व्याजासकट आपण नक्कीच करू अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी या सभेतून केली. आता ते येणाऱ्या निवडणूक झाल्यावरच कळेल की, कोण कोणाची परतफेड कशी करतील? चंद्रपुरातील जनता चांगली शुज्ञ असून राजकीय घडामोडी समजणारी आहे!.