राणी हिराई जयंती आदिवासी समाज संघटनाकडून साजरी



राणी हिराई जयंती आदिवासी समाज संघटनाकडून साजरी


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी
चंद्रपूर ज्याचे आद्य नाव चांदागड नगर वसाविणाऱ्या राणी हिराई आत्राम यांची जयंती अंचलेश्वर गेट तथा समाधी स्थळी आदिवासी संघटनानी हजेरी लावून साजरी केली.
राणी हिराईने वसवलेली चांदागड नगरी अत्यंत दूरदृष्टीची असून राणीच्या कार्याकडे प्रस्थापीत सत्ताधाऱ्यानी कायम पाट फिरविली असल्याचे चित्र दिसून येत आहे.म्हणून सातत्याने आदिवासी समाजाला युज & थ्रो समजू पाहणाऱ्या सत्ताधारी लोकांबद्दल समस्त आदिवासी समाज संघटना एकत्र येऊन आपल्या गोंडकालिन धारोहरला जतन करणे संरक्षण करणे.तसेच सर्व आदिवासी थोर क्रांतिकारक बलिदानी महामानवांचा इतिहास पुढे आणण्यासाठी आग्रही दिसून येत पुढे येऊन राणी हिराई आत्राम यांच्या जयंती प्रित्यर्थ एकत्र आल्या.व मोहिमेला सुरुवात केली.
तरी ह्या कार्यक्रमात राणी हिराई आत्रमच्या समाधी स्थळाला मानवंदना व प्रतिमेला पुष्प हार घालत. अल्पपोहार वाटप केला.
ह्या कार्यक्रमात गोंडीयन गड किल्ले संरक्षण समितीचे अध्यक्ष राजेंद्र धुर्वे,क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके समितीचे अध्यक्ष विठ्ठल कुमरे, बिरसा सेनेचे अध्यक्ष कमलेश आत्राम,बिरसा क्राती दलचे अध्यक्ष अशोक उईके,आदिवासी परधान समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भोला मडावी सह किशोर शेडमाके , शंकर उईके,रोशन मडावी,वैशाली मेश्राम तथा आदिवासी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.