भिवापूर वार्डात पाण्यासाठी हाहाकार, मनपाची अमृत योजना खिळखिळी !




भिवापूर वार्डात पाण्यासाठी हाहाकार, मनपाची अमृत योजना खिळखिळी !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात मनपा प्रशासन सुरू झाले तेव्हापासून मनपा अधिकाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे शहरातील पूर्ण व्यवस्था खिळखिळी झाली आहे. वार्डात नगरसेवक नसल्याने वार्डातील नागरिकांची गैरसोय होत आहे. सदर नागरिक वार्डातील नगरसेवकाकडे गेल्यास आणि नगरसेवक प्रशासनाकडे गेल्यास तुम्ही पदाधिकारी नाहीत असा रोष अधिकाऱ्याकडून व्यक्त केला जातो.
चंद्रपूर जिल्ह्याचा पारा 44 अंशावर आहे. सूर्य आग ओकत आहे. प्रशासनाने उन्हाच्या संरक्षणासाठी काळजी घ्यावी म्हणून आव्हान केले आहे. परंतु मनपा प्रशासन नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत आहे. सदर मनपा प्रशासनाकडून शहरात सगळीकडे सुरळीत पाणीपुरवठा होत असतानाचा आव करीत आहे.मात्र भिवापूर वार्ड येथील नागरिकांना चार -चार दिवस पाण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. याच परिसरात महाकाली मातेची भव्य यात्रा होऊन गेली. परंतु या परिसरात अजूनही पाण्याची समस्या पूर्णत्वास गेली नाही.
 शहरात अमृत योजनेच्या नावाने जनतेला विष कालवण्याचे काम मनपा प्रशासनाकडून केल्या जात असल्याची खंत माजी नगरसेवक वसंत देशमुख, नगरसेविका मंगला आखरे यांनी केली आहे. सध्या वार्डात नगरसेवक नसल्याने प्रशासनाची मनोपली सुरू झाली आहे. कुठलाही अधिकारी -कर्मचारी सामान्य माणसाचं सोळा माजी नगरसेवकांचे , पत्रकारांचे सुद्धा फोन उचलण्यास तयार नाहीत. येथील कर्मचारी असलेले वाल्मन यांची सुद्धा मुजोरी वाढली असून यांच्याकडे प्रशासनाचे लक्ष नाहीत. एकमेकांवर ढकलून काम मारून नेण्याचे प्रयत्न मनपा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे सुरू आहे.
मुख्य रस्त्यावर लाईटची व्यवस्था असो की वार्डातील कचऱ्याची समस्या असो याकडे मनपा प्रशासनाने सक्षम दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
या सर्व बाबींना मनपा प्रशासनातील मुख्य अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना सुद्धा याकडे गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. म्हणून आयुक्तांनी या जनहितार्थ समस्या कडे गांभीर्याने लक्ष देऊन भिवापूर वार्डातील पाणीपुरवठा नेहमीसाठी सुरळीत करण्याची माग आता नागरिकाकडून होत आहे.