अखेर आ. किशोर जोरगेवार यांनी ' चमत्कारि पीएला केले पायउतार !




अखेर आ. किशोर जोरगेवार यांनी ' चमत्कारि पीएला केले पायउतार !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक सुबोध जुन्नावार अनेक चर्चात आल्यानंतर त्याला आमदार साहेबांनी आपल्या कार्यालयातून स्वीय सहाय्यक पदावरून पदमुक्त केल्याची चर्चा होत आहे. या धाडसी निर्णयाचे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांचे सर्वीकडून स्वागत,आभार मानण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, सुबोध हे मागील चार वर्षापासून आ.किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक पदावर कार्यरत होते. मात्र या काळात त्यांनी आमदाराच्या असाहाय्यतेचा फायदा घेत  अनेक चमत्कारिक कामे करून घेतली.  त्यात मुख्य म्हणजे त्याला काही वर्षा अगोदर आजार झाला होता. तो  ऑपरेशन नंतर आजार बरा झाला.  या  आधारावर त्यांनी शासकीय रुग्णालयातून  अपंगत्वाचे  42 टक्के असल्याचे दिव्यांगाचे अस्थाई स्वरूपाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले.
 संजय गांधी निराधार योजनेचा, वीस हजार उत्पन्न असलेल्या दाखल्याचा, अशा त्या आधारावर त्यांनी अनेक शासकीय कार्यालयात आपला काम साधूपणा  निभवून घेतला.  एवढेच नाही तर वन विभागाच्या आमदार   कोट्यातून  जंगल सफारीसाठी  जी वशिलेबाजी  लावल्या जाते.  त्यात स्वतःचे अर्थकारण करून घेत असल्याची सूत्राची माहिती आहे.
 असे याचे  गबाळ  वर्तमानपत्रात बाहेर आले.  किशोर भाऊच्या   डोळ्यावरची पट्टी उघडल्या गेली. आणि उशिरा का होईना सर्व घटना आमदार किशोर जोरगेवार यांच्या लक्षात यायला लागले.  किशोर भाऊंनी कठोर निर्णय घेऊन अखेर चमत्कारिक पीएला पायउतार केले.
 आमदार किशोर जोरगेवार यांच्या असायतेचा फायदा घेणाऱ्या सुबोधला आपल्या पदावरून पदमुक्त व्हावे लागले.
 किशोर भाऊंना चंद्रपूरकरांनी भरभरून प्रेम दिले आहे, त्या प्रेमाला कुठेही तडा जाऊ न देता, विधानसभेत खास करून ग्रामीण भागात कामाचा सपाटाच लावला. त्यामुळे किशोर भाऊ चे वजन ग्रामीण भागात चांगल्या प्रकारचे वाढले आहेत. त्यात कार्यकर्ते सुद्धा तन-मन-धनाने काम करू लागले आहेत. म्हणून
 किशोर भाऊ यांना सच्चा कार्यकर्त्याची ओळख व्हावी, अन्यथा येणाऱ्या  विधानसभा निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्याकडून  निवडणुकीत  दगा फटका होऊ नये याची खात्री बाळगावी  कार्यकर्ताच हा लोकप्रतिनिधीचा मजबूत धागा असतो. मात्र काही विश्वासघातकी  लोकांमुळे  सच्चा कार्यकर्ता दुरावल्या जातो. याची पडताळणी करून पुन्हा आपल्या कार्यालयात अशा प्रकारच्या स्वार्थी वृत्तीचा विश्वसनीय असलेला  कॅटलीला वेळीच आवरावे.  त्या  कॅटलीचे म्हणणे आहे   की, राजकारण हे पाच वर्षासाठी असते. जेवढे समेटता येईल तेवढे जमा करायचे. आज आहे .उद्या राहणार की नाही, याची शाश्वती नसल्याने मनमर्जीपणाने   कॅटली  आपले वखार भरण्याचे काम बिंदास करीत असल्याची चर्चा  चंद्रपूर शहरात होत आहे. म्हणून योग्य वेळी किशोर भाऊने  याचे आकुड कासरे करावे. नाहीतर तो दुसरा सुबोध होईल. अशी चर्चा  जन माणसात  होत आहे.