चंद्रपूर पंचायत समिती कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन




चंद्रपूर पंचायत समिती कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पंचायत समिती चंद्रपूर तथा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा, चंद्रपूर/बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर पंचायत समिती कार्यालयात आज दिनांक 3/5//2024 ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व उद्घाटक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी रक्तदानासंदर्भाचे महत्व यावेळी पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी धनंजय साळवे होते. मंचावर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती.
पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य करून या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग दर्शवून जवळपास शेकडो रक्तदात्यांनी स्वयं स्फूर्तीने रक्तदान केले.
' थेंब आहे हा रक्ताचा, आधार आहे दुसऱ्याच्या जीवनाचा,'
एप्रिल मे महिन्यात आरोग्य विभागात रक्ताचा तुथवडा जाणवतो. अशा वेळेस रक्ताची कमतरता भासत असल्याने. आवश्यक गरजूंना रक्त पुरवठा व्हावा हा हेतू ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
गरजूंना रक्ताचा पुरवठा व्हावा हा हेतू ठेवून शिबिराचे आयोजन करण्यात आले गरजवंताचे प्राण वाचवण्यासाठी मोलाचे सहकार्य व्हावे या दृष्टिकोनातून
पंचायत समिती, चंद्रपूर / बल्लारपूर तथा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा चंद्रपूर/बल्लारपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात आपण सक्रिय सहभाग घेऊन / रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा गौरव म्हणून आदर्श प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र स्नेह प्रदान करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, ग्रामसेवक कर्मचारी,   शिक्षकेतर कर्मचारी,  यांनी मोलाचे योगदान दिले.  या कार्यक्रमाची  प्रास्ताविक गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन सुजाता कातकर यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विभा सहारे यांनी  मानले.