एकाच अधिकाऱ्याकडे अनेक प्रभार, अजब अधिकाऱ्याची गजब कहानी ! जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकारएकाच अधिकाऱ्याकडे अनेक प्रभार, अजब अधिकाऱ्याची गजब कहानी ! जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉक्टर हेमचंद कन्नाके हे वर्ग दोन गट अ वैद्यकीय अधिकारी म्हणून जिल्हा क्षयरोग केंद्र येथे कार्यरत आहेत. आजही त्यांच्या हजेरीपटावर जिल्हा क्षयरोग विभागातून त्यांचा पगार होत असतो. असे असताना दिनांक 9/ 12 / 2019 पासून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे निवासी वैद्यकीय अधिकारी( बाह्य संपर्क) म्हणून प्रतिनियुक्ती देण्यात आली. त्यांच्याकडे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येतील अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यामुळे डॉक्टर कन्नाके हे दिनांक 9/ 12/20 19 पासून आज पर्यंत आपली वैद्यकीय सेवा ही जिल्हा क्षय रोग केंद्र येथे देत नसून ते जिल्हाशल चिकित्सक कार्यालयात उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांच्या आदेशान्वये आज तयात ठाण मांडून बसले आहेत.
जवळपास चार वर्ष सहा महिन्यांचा कालावधी होऊन रुग्णालयात क्षय तज्ञ सेवेपासून ते वंचित राहिले आहेत. त्यामुळे या कार्यालयात शासनाच्या महत्त्वकांक्षी राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अमलबजावणी होण्यास अडथळा निर्माण होत असताना सुद्धा त्यांनी या कार्यालयाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते. तत्वतः या कार्यालयात क्षय रुग्णालयात डॉक्टर तोडासे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी पदभार सांभाळला. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ए क्लासचे डॉक्टर ललित पटले हे आहेत.
परंतु या ठिकाणी अ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर हेमचंद कन्नाके यांची खरी प्रतिनियुक्ती/ सेवा संलग्न कुठल्या वैद्यकीय कार्यालयात , कुठल्या आधारावर एकाच अधिकाऱ्याचे अनेक प्रभार हा मात्र आता संशोधनाचा विषय आहे.
कारण जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे प्रशासकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉक्टर कन्नाके यांच्याकडे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग एक व वर्ग दोन चे अनेक अधिकारी उपलब्ध असताना एकाच अधिकाऱ्याकडे मूळ आस्थापना जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील नसूनही त्यांनाच प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांनी (बाह्य संपर्क) यांचे कडे जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा तात्पुरत्या स्वरूपाचा रुग्णालयीन कार्यभार सोपवण्याचे समोर येत आहे. एकाच अधिकाऱ्याकडे अनेक प्रभार सोपवल्याने आता सामान्य रुग्णालयात 'अजब अधिकाऱ्याची गजब कहानी! मुळे गैरव्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे.

डॉ. कन्नाकेवर डॉ. चिंचोळे एवढे मेहरबान का?

जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉक्टर चिंचोळे या महिन्यातच पदमुक्त होत आहेत. परंतु टीबी हॉस्पिटलचे एम ओ डॉक्टर कन्नाके यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र नियुक्ती आहे. असे असताना त्यांना सामान्य रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आले आहेत. एवढे असताना त्यांच्याकडे सामान्य रुग्णालयातील अनेक प्रभार, तथा प्रशासकीय अधिकार देण्यासाठी शल्यचिक डॉक्टर चिंचोळे एवढे मेहरबान का? त्यांचा काही महिन्यापूर्वी पदभार संपला असताना पुन्हा उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांच्याकडून पदभार कार्यान्वित करण्यात आला यावरून डॉक्टर चिंचोळे यांच्यावर संपूर्ण सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रोष व्यक्त होत आहे. या सामान्य रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी या दर्जाचे अधिकारी असताना सुद्धा हेतू पुरस्कर डॉक्टर चिंचोळे यांनी ॅडा कन्नाके यांना संपूर्ण प्रशासकीय अधिकार सोपवण्यात आला आहे.


जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक अधिकारी या पदासाठी तत्पर असताना डॉक्टर किंवा यांच्याकडेच अनेक प्रकार का सोपवल्या जातात. मात्र सामान्य नागरिकांना पडला आहे. वरिष्ठ अनुभवी अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यान्वित असताना सुद्धा डॉक्टर हेमचंद कन्नाचे वर्ग दोन गट वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे
दिनांक 16 /17 मे 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत प्रकल्प अमलबजावण्यासाठी जिल्हाशल्यचिकीशक डॉक्टर महादेव चिंचोळे बैठक व कार्यशाळा मुख्यालय सोडत असल्याने दिनांक 15/ 5/20 24 पासून ते मुख्यालय रुजू होईपर्यंत डॉक्टर हेमचंद कन्नाके त्यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपवल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील प्रशासकीय अधिकारी तथा आहरण व सवितरण अधिकारी पदाचा कार्यभार डॉक्टर हेमचंद कन्नाके यांच्याकडे यापूर्वी सोपवण्यात आला होता.  असे अनेक  प्रभार  या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. सूत्राच्या माहितीनुसार  डॉक्टर हेमंत कन्नाके यांचे  लवकरच येणाऱ्या काही महिन्यात  जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर विराजमान  तर होणार नाहीत ना? अशी शंका आता वैद्यकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.