पंचायत समितीत हिराई उपहारगृह नागरिकांसाठी वरदान




पंचायत समितीत हिराई उपहारगृह नागरिकांसाठी वरदान

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर पंचायत समितीच्या आवारात हिराई उपहारगृह सुरू करण्यात आले आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान तालुका व्यवस्थापन यांच्या माध्यमातून ग्रामीण महिला बचत गट उत्पादित वस्तूचे विक्री करण या माध्यमातून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करता यावा यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याचे जिथे जागते उदाहरण चंद्रपूर पंचायत समितीच्या आवारात ग्रामीण महिला बचत गट यांच्या माध्यमातून हिराई उपहारगृह सुरू करण्यात आले आहे. यासाठी पंचायत समिती तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही मोठे सहकार्य लाभत असून
या उपहारगृहाला नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता, चहा, एवढेच नाही तर चंद्रपूरच्या उष्णतेची दहाहक्ता पाहून ताक ,नींबू शरबत अशा थंड पिण्याची व्यवस्थित हिराई उपहारगृहात करण्यात आली आहे. त्यामुळे या पंचायत समिती परिसरात तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन विभागाच्या कर्मचारी जवळपास या सर्व परिसरात असलेल्या प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच कामासाठी बाहेर गावून येणाऱ्या नागरिकांसाठी हिराई उपहारगृह वरदान ठरले आहे. या उपहारगृहाच्या संचालिका सौ. सुनीता नन्नावरे, सौ. गौतमा रायपुरे, ह्या असून नागरिकांनी हिराई उपग्रहाला एकदा अवश्य भेट द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.