आज मनपाचा हातोडा चालला गोल बाजारावर !आज मनपाचा हातोडा चालला गोल बाजारावर !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात मागील एक हप्त्यापासून अतिक्रमण धारकावर बुलडोजर सुरू आहे.
रस्त्यावरील अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमण धारकावर चंद्रपूर महानगरपालिका, पोलीस विभाग व वाहतूक पोलीस त्यांच्या संयुक्त कारवाईतून शहरात होत असलेले अतिक्रमणावर मनपाचे बुलडोझर सुरू आहे.
आज चंद्रपूर शहरातल्या मुख्य गजबजलेला गोल बाजारावर जेसीबी चालवून अतिक्रमण पाडले.
काही रस्त्यावरील चार चाकी वाहने, दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून अनेक दुकानदारांचे फूटपाथ वर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. दुकानात समोर लावून ठेवलेले पत्र्याचे शेड लावून ठेवलेले काढण्यात आले. मागील काही दिवसापासून रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्याच्या सूचना मनपातर्फे आटोद्वारे देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कारवाई ची तमा न बाळगता अतिक्रमण उभे होते. त्यामुळे मनपा व पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात आली.
मात्र या कारवाईवर सामान्य व्यापारी मात्र चांगले मनपा प्रशासनावर रोष व्यक्त करत आहेत. ते म्हणतात की, जर चंद्रपूर शहरातले अतिक्रमणच काढायचे आहे. तर मुख्य मार्गावरील दोन्ही रस्त्याच्या बाजूला धनदागळ्यांनी मोठमोठे व्यावसायिक आणि बिल्डिंग उभ्या केल्या आहेत. त्यांच्यावर मनपा प्रशासन खरंच बुलडोजर चालवेल का? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांतून केला जात आहे. जर छोट्या व्यवसायिकाचे रस्त्यावर अतिक्रमण दिसत असेल, तर मोठ्यांचे अतिक्रमण रस्त्यावर नाही का? त्यावर मनपा प्रशासन आपला बुलडोजर चालवेल का? असा प्रश्न आता जन माणसातून प्रशासनावर होत आहे.
अनेक ठिकाणी मनपाने भेदभाव पूर्ण कारवाई केल्याचा आरोपही यापूर्वी अनेकांनी केला आहे. मग ती कुणाच्या सांगण्यावरून केली जात आहे. जर मनपाला कारवाई करायची आहे प्रादर्शकता ठेवून कारवाई करावी. अशी चर्चा चंद्रपूर शहरात होत आहे.