'त्या' ताडोबातील ई -सफारी जिप्सीवर आरटीओची कारवाई की, दिखावा !
RTO द्वारा चार जिप्सीन्वर कार्यवाही, बाकी जिप्सीचे काय?
  
दिनचर्या न्युज :-  
चंद्रपूर :-
चंद्रपुर येथील ताडोबा अंधेरी व्याघ्य  बफर क्षेत्रातील जंगलात प्रदूषण कमी करण्यासाठी ताडोबा जंगल क्षेत्रात चालणाऱ्या जिपसिंना इलेक्ट्रिक वाहन करण्याची  सुपीक  संकल्पना  येथील अधिकारी  उपसंचालक कुशाग्र  पाठक यांची आहे. सूत्राच्या माहितीनुसार ह्या गाडी सप्लायर त्यांचा मित्र  असल्याची चर्चा होत आहे.    ईशा फॅब फायनान्स कंपनी  कडून जिप्सी चे वाटप करण्यात आले आहे.
ताडोबा सफारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जिप्सी अनेक संशयास्पद  वावरत असून त्याची माहिती आरटीओ विभागाकडे नाही का? वापरण्यात येणाऱ्या जिप्सी चे चेसिस , त्या जिप्सींना लावण्यात आलेले आरटीओ पासिंग  फ्लॅट नंबर आणि वावरत असलेल्या मुदत बाय झालेल्या गाड्यांची चौकशी झाल्यास  ताडोबा सफारी मध्ये अनेक गाड्यांचा  गोरख धंदा बाहेर येईल. या वहानाने कदाचित अपघात घडलास तर जबाबदार कोण? 
 त्यावर संबंधित विभागाने योग्य ती नियमानुसार कारवाई करून  यात अनधिकृत नियमबाह्य इनवाल असलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी.
पूर्वी पेट्रोलवर चालणाऱ्या जिप्सींचे इलेक्ट्रिकल जिप्सीमध्ये रूपांतर झाले.1) UP-23G-0095 2) MH-40 CQ-6874,3) MH-12 QF-6368,4) MHJH 14 2004,5) DL-CAK-8185,6) MH-40CQ-5807
वनविभागाशी संबंधित जिप्सी 1) MH34-8185,2) MH34-8315  अशा प्रकारच्या नंबरच्या गाड्या सध्या ताडोबा सफारी मध्ये सुरू  आहेत. त्यातील चार गाड्यावर आरटीओने  कारवाई  केली. पण बाकी जिप्सी चे काय?
RTO अधिकारी कदाचित TATR समकक्षांशी संगनमत  होणार तर नाही ना?
 ई सफारी करिता वापरण्यात येणाऱ्या आठ जिप्सी हा पेट्रोलवर धावणाऱ्या असून अनेक जिप्सी मुदत बाह्य धावत आहेत वन अधिकारी, आणि संबंधित कंत्राटदार, फायनान्स कंपनी यांच्या संगमने  ही सफारी मध्ये गाड्यांचे बेकायदेशीर रूपांतर करून,  त्या गाड्यांचे परमिट पेट्रोलचे घेऊन  स्थानिक  बेरोजगारांची फसवणूक  केल्याचे सध्यातरी आरटीओ कार्यालयातून माहिती उपलब्ध झाली आहे.
स्थानिकांना रोजगार मिळावा हा वन विभागाचा उद्देश असला तरी, इलेक्ट्रॉनिक गाड्यांना प्रादेशिक परिवहन महामंडळाची रीतसर परवानगी आहे का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे! संबंधित वनविभागाने पेट्रोलवर चालणाऱ्या गाळ्यान्या इलेक्ट्रिक गाड्यात परिवर्तन केल्याची बाब समोर येत आहे. ज्या कंपनीतून ई- सफारी जिप्सी बोलवण्यात आल्या त्या जिप्सीचे चेसेस नबंर आणि इंजिन यात तफावत तर नाही ना! याची तफासणी केल्यास यात मोठे राकेट समोर येथील.    एवढा सारा प्रकार उघड्या डोळ्यासमोर होत असताना  आरटीओ ने धूर्तराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधून भूमिका घेतल्याचे दिसून येते.
 

 
 
 
 
