' तो' अपघातच! पण विपर्यास, षडयंत्राचा बळी करण्याचा मनसुबा!

' तो' अपघातच! पण विपर्यास, षडयंत्राचा बळी करण्याचा मनसुबा!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
तो ... दिवस! भरधाव वेगाने एक सुसाट बाईक स्वार जाऊन धडकतो आणि घटनास्थळी पडला जातो. कुणालाही काही कल्पना नसते. आणि अचानक एक दुर्दैवी घटना घडते. त्या घटनेच्या दिशेने माणुसकी म्हणून जीव वाचवण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न असतो. अपघातग्रस्तांना उचलून बाजूला ठेवल्या जातात. रस्ता मोकळा केला जातो. सदर घटनेची माहिती संबंधित पोलीस विभागाला भ्रमणध्वनीवरून दिली जाते. प्रत्यक्ष दर्शनी घटनास्थळावर निघून जातात. अपघातग्रस्तांना पोलीस पुढील उपचारासाठी घेऊन जातात. पण त्या ठिकाणी जमलेल्या तमाम नागरिकाच्या आकलन शक्तीचे प्रदर्शन होते, वादळासारखी चर्चा पसरत जाते. त्या घटनेला राजकीय स्वरूप प्राप्त होते. समाजातील विघातक प्रवृत्ती,विरोधकांचे मनसुबे त्या घटनेचा विपर्यास करून 'चिंधीचा साप' बनवण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर त्या अपघाताला वेगळेच वळण देऊन बळी करण्याचा प्रयत्न कटकारस्थान रचण्याचे मनसोबा ! वैयक्तिक दुश्मनीतील अनेकांनी त्याला रंग देऊन सुशोभित करून वनवा पेटवला! आणि त्या वनव्याचा झार पूर्ण गावभर धुंद्रेला दिसू लागला. ती ज्वाला आणि धूर इतकी भयानक होती की , त्या घटनेतील अपघाताला बाजूला ठेवून ' राईचा पहाड' बनवून वेगळेच वळण देण्याचे षडयंत्र सुरू झाले होते. काही हितचिंतकांना 'वेट अँड वॉच' तर काहीना 'देर है अंधेर नही! प्रतीक्षाच करणे औचित्याचे त्यांना वाटले! पण म्हणतात ना, कर नाही त्याला डर कशाला! भगवंताला ही चांगले आणि वाईट माहित असते! पण त्या माणसाचे काय? राईचा पहाळ करणे! हा माणसाचा अवघूनच असतो. कारण गिधाळाच्या श्रापाने ढोर मरत नसतात. मात्र नक्की जीवनात चांगलं काय! वाईट काय! याची शिकवण मात्र जरूर मिळते. त्यातूनच आपले कोण, परके कोण, याची परीक्षा करण्याची अवघड संधी मिळते. कुणाला तरकी तर कुणाला चांगलं पावत नसल्याची जाणीव होते. असे प्रसंग कुण्या दुश्मनावर येऊ नये, कारण कोणीही अपघातात जखमी झालेल्या अपरिचित असणाऱ्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला दुःख हे खूप काही सांगून जाते. ते वादळ तर निघून गेले. पण त्या वादळात जखमी झालेल्या च्या मनाच्या जखमा मात्र कायमस्वरूपी स्मरणात शल्य देत राहतात!
मात्र अशा घटना घडल्यास कुणीही माणूस  स्वतःहून  अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही?
म्हणून अशा दुर्दैवी घटनांना माणूस परमर्श करण्यास दुरावला जातो. अशा विदारक घटनांत माणूस काळोख्याच्या अंधारात घसाटण्याची भीती नक्की भयावत असते. एवढेच म्हणून इच्छितो 'सत्यमेव जयते'!